ईडन गार्डन्सवरील पिच फंलदाजासाठी फायदेशीर आणि अनुकूल मानली जाते. या पिचवर दव मोठी भूमिका बजावू शकतो. म्हणून नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांपैकी २ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानी जिंकले आहेत. तर, २ सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानी जिंकले आहेत. येथे सायंकाळी तापमान ३० ते ३३ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तसेच, हवामान खात्याने पावसाची दाट शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे सामन्यावर परिणाम होऊ शकतो.
कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत ३६ सामने खेळले गेलेले आहेत. यापैकी कोलकाताने ११ तर मुंबईने २५ सामने जिंकले आहेत. म्हणजेच, आतापर्यंतच्या सामन्यात मुंबईने कोलकात्यावर वर्चस्व गाजवले आहे. आयपीएल २०२६ मध्ये कोलकाताने १२ पैकी ५ सामने जिंकले आहेत तर ६ सामने गमावले आहेत. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. ११ गुणांसह ते गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत. तर मुंबई इंडियन्सने १२ पैकी फक्त ४ सामने जिंकले आहेत. ते ८ गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत.
कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, रघु शर्मा
‘आईसाठी होतं….’ वैभव सूर्यवंशीने जगासमोर लपवलं पण ड्रेसिंग रूममध्ये झाला भावूक, व्यक्त केलं मन






