
भारताने मालिका घातली खिशात (फोटो सौजन्य - Instagram)
अफगाणिस्तानसाठी इब्राहिम झद्रान सर्वाधिक ३७ धावा करणारा फलंदाज ठरला, तर राधेश खानने नाबाद २८ धावा केल्या. दरविश रसूलीने २६ धावा केल्या. भारतासाठी नितीश कुमार रेड्डीने तीन बळी घेतले. त्याने तीन षटके गोलंदाजी केली आणि प्रत्येक षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बळी घेतला. अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वैभव सूर्यवंशीला पुन्हा एकदा संघात स्थान मिळाले नाही, तर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झालेल्या वरुण चक्रवर्तीच्या जागी रवी बिश्नोईला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले.
IND Vs AFG: रेड्डीने पठाणांना अक्षरश: झोपवलं! भारताला सिरिज जिंकण्यासाठी 160 रन्सची आवश्यकता
भारताने ८८ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. अभिषेक शर्मा १९ चेंडूंमध्ये ३९ धावा करून बाद झाला. रशीद खानने त्याला अटलकरवी झेलबाद केले. त्याच षटकात त्याने सॅमसनला नबीकरवी झेलबाद केले. संजू सॅमसन अर्धशतकानंतर बाद झाला. टी-२० विश्वचषकानंतरचे हे त्याचे पहिले अर्धशतक आहे. त्याने २२ चेंडूंमध्ये सात चौकार आणि चार षटकारांसह ५७ धावा केल्या.
७ षटकांनंतर भारताची धावसंख्या २ गडी बाद ९९ अशी होती. रशीद खानने नेहमीप्रमाणे आपल्या गोलंदाजीची कमाल करत अफगाणिस्तानला तिन्ही मोठ्या विकेट्स मिळवून दिल्या. एकाच षटकात अभिषेक, संजूला कॅच आऊट केले तर श्रेयसची विकेटही त्यानेच काढली. रशीदने धावा जास्त दिल्या असल्या तरीही अफगाणिस्तानच्या टीमसाठी तोच तारणहार ठरला असल्याचं दिसून आलं.
संजू सॅमसनने कहर केला. त्याचा स्ट्राईक रेट आजच्या सामन्यात २०० च्या वर आहे. एकाच षटकात त्याने 6,4,4,6 मारत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना गपगार केलं असल्याचं दिसून आलं. दोन्ही बाजूने संजू आणि अभिषेकने चांगली खेळी करत भारताला उत्तम सुरूवात करून दिली आणि त्यानंतर आलेल्या इशानने त्यावर कळस चढवला. इशान किशनने या सामन्यातही ३८ धावा केल्या.
IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री
अर्शदीप सिंगने भारताला पहिले यश मिळवून दिले. रहमानुल्ला गुरबाजला सलग दुसऱ्या सामन्यातही खाते उघडता आले नाही. यानंतर मात्र अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी चांगला खेळ दाखविण्याचा प्रयत्न केला. जसप्रीत बुमराहला इब्राहिम झद्रानने लागोपाठ दोन चौकार मारले आणि आपला इरादा स्पष्ट केला. मात्र नितीश रेड्डीच्या झंझावातापुढे अफगाणिस्तानचा संघ कमाल करू शकला नाही. नितीश रेड्डीने इब्राहिम झद्रानला बाद केले. पहिल्या टी२० सामन्यात नितीश कुमार रेड्डीची चांगलीच धुलाई झाली होती, पण त्याने या सामन्याची सुरुवात पहिल्याच चेंडूवर बळी घेऊन केली. यानंतर थोड्या थोड्या अंतरावर अफगाणिस्तानच्या खेळाडूंची विकेट जात राहिली आणि केवळ १६० धावांचे लक्ष्य भारताल दिले.