
IND vs NZ: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
हा संपूर्ण सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली असून सर्व तिकिट्स विकली गेली आहेत. मात्र न्यूझीलंड एक तरी सामना जिंकणार का? अशी आता चर्चा सुरू झाली आहे. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या संघाचा डोक्याचा ताप नक्कीच वाढला आहे.
IND Vs NZ: न्यूझीलंड मायदेशात लाज राखणार? अभिषेक शर्मा अन् वैभव सूर्यवंशी…; चौथा सामना कधी?
हॅगली ओव्हल येथे मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यादरम्यान लॉकी फर्ग्युसनला त्याच्या उजव्या पोटरीमध्ये वेदना जाणवल्या. स्कॅनमध्ये स्नायूला ताण आल्याचे उघड झाले. न्यूझीलंड क्रिकेटने लॉकीबद्दल माहिती देताना सांगितले की, मैदानावर परतण्यापूर्वी त्याला बरे होण्यासाठी अंदाजे आणखी एक आठवडा लागू शकतो. त्याच्या जागी शेवटच्या दोन टी२० सामन्यांसाठी मॅट फिशरची निवड करण्यात आली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका ४ नोव्हेंबरला सुरू होत आहे. न्यूझीलंड संघाला आशा असेल की त्या मालिकेपूर्वी लॉकी तंदुरुस्त होईल. दरम्यान, वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला दुसऱ्या टी२० सामन्यादरम्यान उजव्या मांडीत वेदना जाणवल्या आणि त्याची तपासणी करण्यात आली. त्याला किरकोळ दुखापत झाली असून, ती बरी होण्यासाठी एक ते दोन आठवडे लागतील. हेन्रीला टी२० मालिकेतून आधीच बाहेर करण्यात आले आहे.
३५ वर्षीय वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळला. त्याने प्रत्येक सामन्यात तीन षटके टाकली आणि अनुक्रमे ३४ व ३७ धावा दिल्या. या प्रक्रियेत त्याला केवळ एक बळी मिळवता आला. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवला.
मालिकेतील तिसऱ्या सामन्यात लॉकी खेळला नाही आणि भारताने १४ व्या षटकात १९९ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. यावेळी न्यूझीलंडची टीम चांगली कामगिरी करू शकली नाही आणि मैदानात क्षेत्ररक्षणातही त्यांची ढिसाळ कामगिरी दिसून आली. आता उर्वरित दोन सामने जिंकून न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्यासाठी भारतीय संघ तयार असेल. मात्र विरूद्ध संघाला कमी लेखण्याची चूक नक्कीच भारतीय संघ करणार नाही.
IND Vs NZ: किवींचं पॅकअप! Abhishek Sharma ने मोडले ‘हे’ रेकॉर्डस; ठोकले खणखणीत शतक
Ans: न्यूझीलंडविरूद्ध चौथा सामना भारत ३० ऑक्टोबर रोजी खेळणार
Ans: शुक्रवारी टी२० सिरीजचा चौथा सामना ऑकलँडमधील इडेन पार्कमध्ये खेळवला जाणार आहे
Ans: लॉकी फर्ग्युसन आणि हेन्री या दोन खेळाडूंना दुखापत झाली असून दोघेही शेवटच्या दोन सामन्यांसाठी बाहेर गेले आहेत