
‘पुना करंडक’ स्पर्धेत स्पार्क ॲकॅडमीचे सलग दोन विजय
प्रथम फलंदाजी करताना स्पार्क क्रिकेट ॲकॅडमीने १३४ धावा उभारल्या. केविन कंकानला याने ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर विहान कार्डेकरने २४ धावांचे योगदान दिले.विजयासाठी १३५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या विराग क्रिकेट ॲकॅडमीचा डाव १५.४ षटकांत ७८ धावांवर आटोपला. विहान कार्डेकरने अवघ्या ५ धावांत चार गडी बाद करत गोलंदाजीतही चमक दाखवली. अहान सिंगने दोन गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाची भर घातली.
Cricket: अजित वाडेकर ॲकॅडमीचा जलवा; ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक’मध्ये सलग 2 दणदणीत विजय
दुसऱ्या सामन्यात स्पार्क क्रिकेट ॲकॅडमीने अजित वाडेकर क्रिकेट ॲकॅडमीचा ५१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना स्पार्क ॲकॅडमीने २० षटकांत २१९ धावांचे आव्हान उभे केले. विहान कार्डेकरने आक्रमक फलंदाजी करताना अवघ्या ६२ चेंडूंत १७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ११९ धावांची शतकी खेळी केली. आर्यन जोगने ४४ धावांची उपयुक्त खेळी करत त्याला चांगली साथ दिली.प्रत्युत्तरात अजित वाडेकर क्रिकेट ॲकॅडमीचा डाव १६८ धावांवर मर्यादित राहिला.
आरव खारकरने ७८ धावा, तर आर्या व्यासने नाबाद ६२ धावांची खेळी करत संघाच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, ऋषभ पहलाजनीने अचूक गोलंदाजी करत मोक्याच्या क्षणी आरव खारकरला बाद केले आणि सामन्याचे पारडे स्पार्कच्या बाजूने झुकवले. त्यानंतर अहान सिंगने चार गडी बाद करत स्पार्क क्रिकेट ॲकॅडमीचा विजय निश्चित केला.
Abu Dhabi T-10 मध्ये असणार वेस्ट इंडिज खेळाडूंचा जलवा, ‘हे’ बॅट्समन बॉलर्सचा घाम गाळणार
अजित वाडेकर संघाचे सलग दोन विजय
डीजेएसजी क्रिकेट ॲकॅडमी आणि स्पोर्ट्स व्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक’ आंतरक्लब १३ वर्षाखालील मुलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत अजित वाडेकर क्रिकेट ॲकॅडमी संघाने सलग दोन विजयांची कामगिरी केली. भुगाव येथील द पूना वेस्टर्न क्लब (पीडब्ल्युसी) येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कैवल्य शिंदे (Pune) याने फटकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अजित वाडेकर क्रिकेट ॲकॅडमीने लाईनअप क्रिकेट ॲकॅडमीवर ८३ धावांनी विजय मिळवला.
Ans: ‘पुना करंडक’ स्पर्धेत विहान कार्डेकरने 24 रन्स आणि 5 विकेट्स घेतल्या.
Ans: ‘पुना करंडक’ स्पर्धेत स्पार्क अकादमीचे सलग 2 विजय झाले आहेत.