Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket: विराज फराटेची वादळी खेळी! ७३ धावांच्या जोरावर राजस्थान रॉयलने प्रतिस्पर्ध्यांला लोळवले

Cricket: दुसऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्स्‌ ॲकॅडमीने स्पार्क क्रिकेट ॲकॅडमीचा ८९ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ५ बाद २१५ धावा उभारल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 27, 2026 | 09:03 PM
राजस्थान ॲकॅडमीचे पुना क्लब करंडकात घोडदौड सुरू

राजस्थान ॲकॅडमीचे पुना क्लब करंडकात घोडदौड सुरू

Follow Us
Follow Us:
  • राजस्थान ॲकॅडमीचे पुना क्लब करंडकात घोडदौड सुरू
  • विराज फराटे, भुजंग धुलगुंडची धडाकेबाज फलंदाजी
  • गोलंदाजांचीही अचूक कामगिरी
पुणे/Cricket: डीजेएसजी क्रिकेट ॲकॅडमी आणि स्पोर्ट्‌स व्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक‌’ आंतरक्लब १३ वर्षांखालील मुलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल ॲकॅडमी (पुणे) संघाने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत सलग दोन सामने जिंकून विजयी आगेकूच केली. भुगाव येथील द पूना वेस्टर्न क्लब (पीडब्ल्युसी) मैदानावर (pune) पार पडलेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल संघाने लाईनअप क्रिकेट ॲकॅडमीचा ६८ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने १८ षटकांत ४ बाद १८० धावांचा भक्कम डोंगर उभा केला.

विराज फराटे याने ३७ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह नाबाद ७३ धावांची आक्रमक खेळी केली, तर त्याला वर्धन कुमार (३९ धावा) आणि आर्यन उचित (३४ धावा) यांनी उत्तम साथ दिली. प्रत्युत्तरात लाईनअप क्रिकेट ॲकॅडमीचा संपूर्ण संघ १६.५ षटकांत ११२ धावांवर गारद झाला. राजस्थानच्या अर्जुन मिश्रा (२/१), अनिरूध्द शिवकुमार (२/४) आणि संचित कुमार (२/१७) यांनी भेदक मारा करत प्रत्येकी दोन गडी बाद केले.

Cricket: अजित वाडेकर ॲकॅडमीचा जलवा; ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक‌’मध्ये सलग 2 दणदणीत विजय

भुजंगची वादळी खेळी

दुसऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्स्‌ ॲकॅडमीने स्पार्क क्रिकेट ॲकॅडमीचा ८९ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ५ बाद २१५ धावा उभारल्या. भुजंग धुलगुंड याने अवघ्या ४४ चेंडूंत ७ चौकार आणि तब्बल १० षटकारांच्या मदतीने ९५ धावांची वादळी खेळी साकारली. रणवीर मालवडकरनेही ४६ चेंडूंत ६४ धावांचे मोलाचे योगदान दिले. २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्पार्क क्रिकेट ॲकॅडमीचा डाव १४.२ षटकांत अवघ्या १२६ धावांवर आटोपला. विहान कार्डेकर (४४ धावा) आणि यश गायकवाड (२९ धावा) यांचा प्रतिकार तोकडा पडला. राजस्थानकडून अर्यमन पावियाने ३ धावांत ३ बळी टिपले, तर विनायक जाधव आणि सदगुरू रेड्डी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

सामन्यांचा संक्षिप्त निकाल (गटसाखळी फेरी)

सामना १: राजस्थान रॉयल ॲकॅडमी: १८ षटकांत ४ बाद १८० धावा (विराज फराटे नाबाद ७३, वर्धन कुमार ३९, आर्यन उचित ३४; ओम बुरके १/२६)
लाईनअप क्रिकेट ॲकॅडमी: १६.५ षटकांत सर्वबाद ११२ धावा (ओम बुरके २१, अवनीश कुलकर्णी २१; अर्जुन मिश्रा २/१, अनिरूध्द शिवकुमार २/४, संचित कुमार २/१७)
निकाल: राजस्थान रॉयल ॲकॅडमी संघ ६८ धावांनी विजयी.
सामनावीर: विराज फराटे.

Cricket: एक शतक अन् २५७ रन्सचे विजय! युनिटी करंडकात आर्यन्स क्रिकेट अकादमीची शानदार कामगिरी

सामना २:

राजस्थान रॉयल्स्‌ ॲकॅडमी: २० षटकांत ५ बाद २१५ धावा (भुजंग धुलगुंड ९५, रणवीर मालवडकर ६४, विनायक जाधव २३; यश गायकवाड ४/३७)
स्पार्क क्रिकेट ॲकॅडमी: १४.२ षटकांत सर्वबाद १२६ धावा (विहान कार्डेकर ४४, यश गायकवाड २९; अर्यमन पाविया ३/३, सदगुरू रेड्डी २/२१, विनायक जाधव २/२४)
निकाल: राजस्थान रॉयल्स्‌ ॲकॅडमी संघ ८९ धावांनी विजयी.
सामनावीर: भुजंग धुलगुंड.

Web Title: Rajasthan academy wins two matches in puna western club cricket league sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Table Tennis: सुयोग पाटीलची जिद्द अन् दमदार खेळ! पिछाडीवरून मुसंडी मारत पटकावले राज्यस्तरीय विजेतेपद
1

Table Tennis: सुयोग पाटीलची जिद्द अन् दमदार खेळ! पिछाडीवरून मुसंडी मारत पटकावले राज्यस्तरीय विजेतेपद

Tennis: शौरेन सोमणची दमदार कामगिरी! १७ आणि १९ वर्षांखालील गटात विजेतेपदावर नाव कोरले
2

Tennis: शौरेन सोमणची दमदार कामगिरी! १७ आणि १९ वर्षांखालील गटात विजेतेपदावर नाव कोरले

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीध निवडणुकीचे आज निकाल जाहीर होणार
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीध निवडणुकीचे आज निकाल जाहीर होणार

Pune Sports: जबरदस्त! विहान कार्डेकरची अष्टपैलू कामगिरी अन् स्पार्क ॲकॅडमीचे…; ‘पुना करंडक’चा थरार
4

Pune Sports: जबरदस्त! विहान कार्डेकरची अष्टपैलू कामगिरी अन् स्पार्क ॲकॅडमीचे…; ‘पुना करंडक’चा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.