
Rohit Sharma
Harmanpreet Kaur चा मैदानात राडा! कर्णधारपद सोडल्यानंतर ठोकलं खणखणीत शतक; मिताली राजचा विक्रम मोडला
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेता चंकी पांडे, इतर अनेक सेलिब्रिटींसोबत नुकतेच ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या सर्वांनी चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. एका चाहत्याने कलाकारांना विचारले की त्यांनी स्वतःबद्दल कोणत्या अफवा ऐकल्या आहेत. करिश्माने तिच्या आहाराबद्दल चर्चा केली, तर चंकीने त्याच्या कंजूसपणाच्या अफवा फेटाळून लावल्या.
दरम्यान, रोहित शर्मानेही त्याच्या निवृत्तीबद्दलच्या सततच्या अफवांवर अखेर मौन सोडले आहे. त्याने स्पष्ट केले की, त्याचा लवकरच निवृत्त होण्याचा कोणताही इरादा नाही. आपल्या शोमध्ये रोहित म्हणाला की, मी माझ्याबद्दल अशा अफवा मी ऐकल्या आहेत आणि अजूनही ऐकत आहे की, मी मी निवृत्त होणार आहे. पण, मला आशा आहे की आमच्या तिघांबद्दलच्या या सर्व अफवा खोट्या ठरतील.
Rohit Sharma on his retirement rumours pic.twitter.com/qOPu0ewfov — Rohshh45 (@rohshh45) October 25, 2026
वृत्तानुसार, माजी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी रोहित शर्माला वगळून यशस्वी जैस्वालला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. आगरकर यांनी प्रज्ञान ओझाला ही गोष्ट रोहितपर्यंत पोहोचवण्यास सांगितले,.कारण तो रोहितचा जवळचा मित्र आहे. या निर्णयामुळे रोहित नाराज झाला आणि त्याने याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामना हा रोहितचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल, असेही म्हटले जात होते.
नंतर, रोहित शर्माने एक शानदार शतक झळकावले आणि बीसीसीआयने हे स्पष्ट केले की जोपर्यंत तो संघाच्या योजनेचा भाग आहे, तोपर्यंत रोहित संघात कायम राहील. त्यानंतर रोहितने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने वेस्ट इंडिविरुद्धच्या मालिकेत धावा करत २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत दावेदारी ठोकली. आता, ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित पुन्हा खेळताना दिसणार आहे.