Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप

IND vs AFG: नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ३० चेंडूंमध्ये विक्रमी शतक झळकावल्यानंतर अभिषेक शर्माने अनोखा जल्लोष केला. सामन्यानंतर, अभिषेक शर्माने स्वतः या जल्लोषामागील कारण स्पष्ट केले.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 18, 2026 | 10:11 AM
अभिषेक शर्माने स्पष्ट केले शतकानंतरच्या सेलिब्रेशनचे रहस्य (फोटो सौजन्य - Instagram)

अभिषेक शर्माने स्पष्ट केले शतकानंतरच्या सेलिब्रेशनचे रहस्य (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • भारत विरूद्ध अफगाणिस्तान सामन्यात अभिषेक शर्माचे शतक, रचला इतिहास 
  • केले खास आणि अनोखे सेलिब्रेशन, दिले स्पष्टीकरण  
  • चाहत्यांनी त्याचे आपापल्या परीने अर्थ लावायला सुरुवात केली. काहींनी तर हा जल्लोष प्रसिद्ध फुटबॉलपटू अर्लिंग हालंडची नक्कल असल्याचे म्हटले
IND vs AFG: ३० चेंडूंमध्ये ऐतिहासिक शतक झळकावून टीम इंडियाला मालिका जिंकण्यास स्टार खेळाडू अभिषेक शर्माने मदत केली. इतकंच नाही तर शतक केल्यानंतर त्याने यावेळी त्याच्या नेहमीच्या पद्धतीने साजरे न करता वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने साजरे केले. काही जणांनी यावर टीका करत फुटबॉल खेळाडू हालंडची नक्कल करत असल्याचे म्हटले. मात्र आता स्वतः अभिषेक शर्माने आपल्या अनोख्या सेलिब्रेशनमागील रहस्य उघड केले आहे. 

या स्फोटक फलंदाजाने स्पष्ट केले की, त्याचे सेलिब्रेशन फुटबॉलपटू अर्लिंग हालंडपासून प्रेरित नव्हते किंवा त्याने त्याचे अनुकरणही केले नव्हते. खरे तर, अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात, या धडाकेबाज सलामीवीराने ३४ चेंडूंमध्ये १०८ धावांची विक्रमी खेळी करून भारताला सामना आणि मालिका दोन्ही जिंकण्यास मदत केली.

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली

शतकानंतर पिचवरच केले ध्यान 

या काळात, अभिषेकने ३० चेंडूंमध्ये शतक पूर्ण करून भारताचा सर्वात जलद टी-२० आंतरराष्ट्रीय शतकवीर बनण्याचा मान मिळवला. रोहित शर्माचा ३४ चेंडूंचा विक्रम मोडल्यानंतर, अभिषेकने आपली बॅट खाली ठेवली, हेल्मेट काढले आणि जणू काही तो शांती मंत्राचा जप करणार आहे अशा ध्यानस्थ मुद्रेत खेळपट्टीवर बसला. यानंतर त्याचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तो ‘ॐ नमः शिवाय’ जप करताना दिसला. अभिषेकच्या चाहत्यांना माहीत आहे की, अभिषेक हा शंकराचा भक्त आहे आणि नियमित ध्यानधारणाही करतो. या अनोख्या सोहळ्याबद्दल अभिषेकने स्पष्ट केले की, 

‘मी गेल्या सहा महिन्यांपासून ते वर्षभरापासून ध्यान आणि चिंतन करत आहे, कारण जेव्हा तुम्ही वर्षभर क्रिकेट खेळता, तेव्हा एक क्रिकेटपटू म्हणून अनेक चढ-उतार येतात. तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे मन शांत कसे ठेवता? मला वाटते की ध्यानधारणेने मला खरोखरच मदत केली आहे, आणि मला फक्त एवढेच वाटत होते की हे कोणीतरी पाहावे, किंवा कोणत्याही क्रिकेटपटूला जाणवावे की गेल्या सहा ते आठ महिन्यांत मला त्याची खरोखरच मदत झाली आहे. त्यामुळे हा एक विशेष सोहळा होता, त्या गोष्टीसाठी जी मला शांत ठेवते.’

भारताने सामना आणि मालिका दोन्ही जिंकले

अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने आपल्या निर्धारित २० षटकांत सात गडी गमावून २२१ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, अफगाणिस्तानचा डाव १४ षटकांत केवळ ९४ धावांवर गुंडाळला गेला. अशाप्रकारे, टीम इंडियाने अंतिम सामना १२७ धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले. भारताने पहिले दोन सामने प्रत्येकी सात गडी राखून जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली होती आणि तिसऱ्या सामन्यात तर अभिषेक नावाच्या वादळामुळे संपूर्ण मालिका खिशात घालण्याचे भाग्य भारतीय टीमला लाभले. 

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज

Web Title: Ind vs afg abhishek sharma opened up about meaning behind new celebration after century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Abhishek Sharma Century
  • IND vs AFG
  • India vs Afghanistan

संबंधित बातम्या

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली
1

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज
2

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक
3

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक

Abhishek Sharma ने केलंयं मार्केट जाम! अफगाणिस्तानविरुद्ध वादळी खेळी अन् ICC रॅंकिंग्समध्ये मोठी झेप
4

Abhishek Sharma ने केलंयं मार्केट जाम! अफगाणिस्तानविरुद्ध वादळी खेळी अन् ICC रॅंकिंग्समध्ये मोठी झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.