Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या 40 धावा अन् तुटणार सूर्यकुमार यादवचा मोठा रेकॉर्ड, ठरणार धुरंधर!

Abhishek Sharma: भारतासाठी एका वर्षात सर्वात जास्त T20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा मोठा रेकॉर्ड सूर्यकुमार यादवच्या नावे आहे. न्यूझीलंडविरूद्ध हा रेकॉर्ड अभिषेक शर्मा तोडू शकतो

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 30, 2026 | 10:14 AM
अभिषेक शर्मा तोडणार दोन मोठे रेकॉर्ड्स (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

अभिषेक शर्मा तोडणार दोन मोठे रेकॉर्ड्स (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अभिषेक शर्मा नावाचे वादळ
  • तोडणार सूर्यकुमार यादवचा एक वर्षातील रेकॉर्ड 
  • ठरणार टी२० आंतरराष्ट्रीय खेळतील एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज 
Abhishek Sharma: भारत आणि न्यूझीलंडदरम्यान टी२० सिरीजचा चौथा सामना आज ३० ऑक्टोबर रोजी ऑकलंडच्या ईडेन पार्कमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा धडाकेबाज खेळ करून दोन मोठे रेकॉर्ड स्वतःच्या नावे करू शकतो. सर्वात पहिले म्हणजे २०२६ या वर्षातील सर्वात जास्त टी२० मध्ये धावा करणारा तो फलंदाज ठरू शकतो, ज्यासाठी त्याला केवळ ३५ धावांची गरज आहे आणि तो आपला मित्र आणि सहखेळाडू ईशान किशनला मागे सोडू शकतो. 

याशिवाय एकाच वर्षात भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय खेळात सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू सूर्यकुमार यादवचा रेकॉर्डही अभिषेक तोडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यासाठी त्याला ४० धावांची आवश्यकता आहे. आज सर्व चाहत्यांचे लक्ष अभिषेकच्या या रेकॉर्डकडे लागून राहील. 

IND vs NZ : ऑकलंडमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस की गोलंदाजांचा हल्लाबोल? ईडन पार्कवर कोण मारणार बाजी? पाहा Pitch Report

अभिषेक शर्माच्या निशाण्यावर सूर्यकुमारचा रेकॉर्ड 

भारतासाठी एका वर्षात सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम सध्या सूर्यकुमार यादव (SKY) यांच्या नावावर आहे. त्यांनी २०२२ मध्ये ३१ सामन्यांमध्ये ११६४ धावा जमवल्या होत्या. स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा आता हा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे. २०२६ मध्ये ३७ टी-२० सामन्यांमध्ये ११२५ धावा करणाऱ्या अभिषेकला, सूर्यकुमार यादव यांचा विक्रम मोडण्यासाठी ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात फक्त ४० धावांची गरज आहे. या सामन्यात ४० धावा करताच तो सूर्यकुमार यादव यांचा विक्रम मोडेल.

अभिषेकने तिसऱ्या टी-२० मध्ये शानदार शतक झळकावले

अभिषेक शर्मा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात एक धमाकेदार खेळी केली. त्या सामन्यात त्याने ३८ चेंडूंमध्ये २९७.३७ च्या स्ट्राईक रेटने ९ चौकार आणि ११ षटकारांसह ११३ धावा केल्या होत्या. वैभव सूर्यवंशीनेही १९ चेंडूंमध्ये ४५ धावांची वेगवान खेळी केली होती. त्यामुळे, अभिषेक आजच्या सामन्यातही हाच फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

ऑकलंडमध्ये होणारा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा चौथा टी-२० सामना अभिषेक शर्मासाठी खूप खास असणार आहे. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की तो या सामन्यात ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांचे मोठे विक्रम मोडू शकतो की नाही. २६ वर्षीय अभिषेकने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७० सामन्यांमध्ये ४ शतके आणि १४ अर्धशतकांसह एकूण २२४० धावा केल्या आहेत.

IND Vs NZ: उद्या नुसता राडा! केवळ 35 रन्स अन् Abhishek Sharma ‘हा’ महारेकॉर्ड करणार

💡

Frequently Asked Questions

  • Que: सूर्यकुमार यादवच्या नावे कोणता रेकॉर्ड आहे?

    Ans: एका वर्षात T20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड सूर्यकुमार यादवच्या नावे आहे

  • Que: अभिषेक शर्माला रेकॉर्ड तोडण्यासाठी किती धावांची गरज आहे?

    Ans: सूर्यकुमारचा रेकॉर्ड तोडण्यासाठी केवळ ४० धावांची गरज अभिषेक शर्माला आहे

  • Que: भारत विरूद्ध न्यूझीलंडचा आजचा सामना कुठे होणार?

    Ans: आजचा सामना ऑकलंड येथील ईडन पार्क येथे होणार आहे

Web Title: Abhishek sharma will create history after making 40 runs break suryakumar yadav record dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IND vs NZ : ऑकलंडमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस की गोलंदाजांचा हल्लाबोल? ईडन पार्कवर कोण मारणार बाजी? पाहा Pitch Report
1

IND vs NZ : ऑकलंडमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस की गोलंदाजांचा हल्लाबोल? ईडन पार्कवर कोण मारणार बाजी? पाहा Pitch Report

IND Vs NZ: उद्या नुसता राडा! केवळ 35 रन्स अन् Abhishek Sharma ‘हा’ महारेकॉर्ड करणार
2

IND Vs NZ: उद्या नुसता राडा! केवळ 35 रन्स अन् Abhishek Sharma ‘हा’ महारेकॉर्ड करणार

IND vs NZ : कीवींचा सुपडा साफ करण्यासाठी भारताचा मास्टरप्लॅन! वैभव सूर्यवंशीला डच्चू अन्  ईशान किशनचे कमबॅक? कशी असेल Playing 11
3

IND vs NZ : कीवींचा सुपडा साफ करण्यासाठी भारताचा मास्टरप्लॅन! वैभव सूर्यवंशीला डच्चू अन् ईशान किशनचे कमबॅक? कशी असेल Playing 11

IND Vs NZ: अजेय, अभेद्य भारताचे वाघ! न्यूझीलंडला फोडणार घाम; ऑकलंडमध्ये कसा आहे रेकॉर्ड?
4

IND Vs NZ: अजेय, अभेद्य भारताचे वाघ! न्यूझीलंडला फोडणार घाम; ऑकलंडमध्ये कसा आहे रेकॉर्ड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.