Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG मालिकेआधी टीम इंडियाची चिंता वाढली; सराव सत्रात ईशान किशनला दुखापत; पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर?

Ishan Kishan Injured Before IND vs AFG 1st T20: भारतीय संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पूर्ण तयारी करत आहे. मात्र, सामन्याच्या अवघ्या काही तास आधी, आणखी ईशान किशनला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 12, 2026 | 03:29 PM
Ishan Kishan Injured

Ishan Kishan Injured

Follow Us
Follow Us:
  • सराव सत्रात ईशान किशन जखमी
  • अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळणार?
  • जाणून घ्या अपडेट
भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेचा पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. टीम इंडिया पहिल्यांदाच आपल्याच घरात पाहुणा संघ म्हणून खेळणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी हर्षित राणाच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. आता, सामन्याच्या दोन दिवस आधी, भारतीय संघाचा स्टार फलंदाज ईशान किशन सराव सत्रादरम्यान जखमी झाला आहे.

IND vs SL: पाकिस्तानला नमवत श्रीलंका फायनलमध्ये; आता भारताविरुद्ध महामुकाबला, कधी अन् कुठे पाहाल सामना?

सरावादरम्यान ईशान किशनला झाली दुखापत

भारतीय संघ सध्या दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सराव करत आहे. सराव सामन्यापूर्वी स्टार फलंदाज ईशान किशनला दुखापत झाली आहे. नेट सरावादरम्यान ईशान फलंदाजी करत होता, तर नवदीप सैनी नेटमध्ये गोलंदाजी करत होता. आपल्या वेगासाठी ओळखल्या जाणाऱ्या सैनीने किशनला एक बाउन्सर टाकला. किशनने चेंडू चुकवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच क्षणी त्याच्या पाठीत वेदना जाणवू लागल्या. यामुळे तो नेट सत्रातून बाहेर पडला. त्यानंतर टीम इंडियाचे फिजिओ कमलेश जैन यांनी त्याची तपासणी केली. काही काळ तो नेटपासून दूर राहिला असला तरी, नंतर त्याने पुन्हा नेटमध्ये फलंदाजी केली. त्यामुळे, त्याची दुखापत फार गंभीर नाही असे म्हटले जात आहे.

Physios attend to Ishan Kishan after he ducks under a bouncer. He felt discomfort in his back. He looks fine after finishing his long batting session. @ITGDsports #AFGvsIND pic.twitter.com/LvUG9MnWzH — Akshay Ramesh (@iamnotakshayr) September 11, 2026

ईशान पहिला टी२० सामना खेळणार का?

ईशानच्या दुखापतीमुळे आता असा प्रश्न निर्माण होतो की, तो अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी२० सामना खेळणार का? टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे कोणता निर्णय घेतील हे पाहणे महत्वाचे ठरेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेच्या अगदी आधी ईशानला झालेली दुखापत भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. ईशान सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकतेच दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात २७० आणि ८० धावांची शानदार खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. वृत्तानुसार, सराव सत्रादरम्यान ईशान फिरकी गोलंदाजांविरुद्ध जोरदार षटकार आणि चौकारही मारत होता. परंतु, दुखापतीची तीव्रता आणि तो मालिकेत खेळू शकेल की नाही, हे पुढील २४ तासांत संघाकडून होणाऱ्या वैद्यकीय तपासणीनंतरच कळेल.

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तानमध्ये T20 थरार; पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; किती वाजता रंगणार मुकाबला?

Web Title: Ind vs afg ishan kishan injured before 1st t20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Ishan Kishan
  • T20 series

संबंधित बातम्या

Washington Sundar: 5 सामन्यात एकही विकेट नाही, केवळ 25 धावा, तरीही T20 मध्ये कशी मिळाली वॉशिंग्टन सुंदरला जागा?
1

Washington Sundar: 5 सामन्यात एकही विकेट नाही, केवळ 25 धावा, तरीही T20 मध्ये कशी मिळाली वॉशिंग्टन सुंदरला जागा?

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तानमध्ये T20 थरार; पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; किती वाजता रंगणार मुकाबला?
2

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तानमध्ये T20 थरार; पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; किती वाजता रंगणार मुकाबला?

Ind vs Afg: कुठे पाहता येणार भारत विरुद्ध अफगणिस्तान टी-20 सिरीज? 13 सप्टेंबरपासून रंगणार थरार
3

Ind vs Afg: कुठे पाहता येणार भारत विरुद्ध अफगणिस्तान टी-20 सिरीज? 13 सप्टेंबरपासून रंगणार थरार

जलवा है भाई का! 13 वर्षांनी ईशान किशनने ईस्ट झोनला जिंकवले; Duleep Trophy 2026 वर कोरले नाव
4

जलवा है भाई का! 13 वर्षांनी ईशान किशनने ईस्ट झोनला जिंकवले; Duleep Trophy 2026 वर कोरले नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.