
Ishan Kishan : ईशान किशनने रचला टी-20 मध्ये इतिहास; असं करत त्याने अनेकांना मागे सारलं
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी-20 सामना हॅमिल्टनच्या सेडन पार्कमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात ईशान किशनने (Ishan Kishan ) सर्वोत्तम फलंदाजी करताना 32 चेंडूंत 61 धावांची दमदार खेळी केली. ईशानने आपल्या या खेळीदरम्यान एक मोठा विक्रम देखील रचला.
ईशान किशनने पाचव्या टी-20 मध्ये सहा धावा करत सूर्यकुमार यादवला पिछाडीवर टाकले. ईशानने टी-20 इंटरनॅशनलमध्ये भारताच्या वतीने एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम रचला आहे. त्याच्याआधी हा रेकॉर्ड सूर्यकुमारच्या नावे होता, त्याने 2022 मध्ये खेळवण्यात आलेल्या 32 टी-20 सामन्यात 1164 धावा रचल्या होत्या.
ईशानने या वर्षी 2026 मध्ये आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या 37 टी-20 सामन्यात 1220 धावा केल्या आहेत. त्यासोबतच ईशानने टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या 2 हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला आहे. तो भारताच्या वतीने कमी चेंडूंत सर्वात वेगवान 2 हजार धावा करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. ईशानने आपल्या 2 हजार धावा 1,345 चेंडूंत पूर्ण केल्या आहेत.
या यादीत यष्टीरक्षक फलंदाज ईशानच्या पुढे अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव आहेत. सुर्यकुमारने हा विक्रम 1164 चेंडूंत पूर्ण केला होता, तर अभिषेकने आपल्या 2 हजार टी-20 धावा 1024 चेंडू खेळत पूर्ण केलेल्या. पाचव्या टी-20 मध्ये टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताची सुरुवात खराब राहिली
अभिषेक फक्त एका धावेवर बाद झाला, तर संजू सॅमसनने फक्त 4 धावा केल्या. अशाप्रकारे भारताची अवस्था 2 बाद 19 धावा अशी झाली, तेव्हा ईशान किशनने कर्णधार श्रेयस अय्यरच्या साथीने संघाचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी फक्त 43 चेंडूंत 93 धावांची भागीदारी रचली.
ईशानने फक्त 28 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. 61 चेंडूंतील आपल्या डावात त्याने 5 चौकार व 5 षटकार ठोकले. तर अय्यरने 23 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 4 षटकारच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. भारताने संघात दोन बदल केले आहेत. वरुण चक्रवर्ती व भुवनेश्वर कुमारला संघात स्थान मिळाले असून मयंक यादव आणि अक्षर पटेलला बाकड्यावर बसवण्यात आले आहे.
Naushad Khan Viral Video: वडिलांची शिकवण कामी आली! नौशाद खान यांच्या लेकाने मोडला ३५ वर्षांचा विक्रम
Ans: ईशान किशनने 32 चेंडूंत 61 धावांची आक्रमक खेळी केली. यात त्याने 5 चौकार आणि 5 षटकार ठोकले.
Ans: ईशानने 2026 या कॅलेंडर वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला.
Ans: ईशानने 1,345 चेंडूंत 2 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.