
Afghanistan Announces squad t20 series
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आपल्या संघात १५ खेळाडूंची घोषणा केली आहेत.तसेच, तीन खेळाडूंना राखीव ठेवण्यात आले आहे. या मालिकेसाठी इब्राहिम जादरानला संघाची कमा न सोपवण्यात आली आहे. या मालिकेचे यजमानपद अफगाणिस्तान भूषवणार आहे. भारतीय संघ प्रथमच स्वतः च्या देशात पाहुणा संघ म्हणून खेळणार आहे. सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळले जातील.पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी, तर दुसरा सामना १५ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना १७ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.
वेगवान गोलंदाज नवीन उल हक बऱ्याच कालावधीनंतर अफगाणिस्तान संघात परतला आहे. दुखापतीमुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका आणि २०२६ चा टी-२० विश्वचषक खेळू शकला नाही. त्याच्या कमबॅकमुळे अफगाणिस्तानचा गोलंदाजी विभाग अधिक मजबूत होईल. तो अनुभवी असून त्याने आयपीएलमध्ये आणि भारतीय भूमीवर बऱ्याच काळापासून अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. फजलहक फारुकी, अब्दुल्ला अहमदझई आणि स्टार अष्टपैलू खेळाडू अझमतुल्ला उमरझई यांच्यामुळेही वेगवान गोलंदाजी विभाग अधिक मजबूत होईल. नवीन व्यतिरिक्त, गुलबदिन नायबचेही संघात पुनरागमन झाले आहे.
या मालिकेच्या दोन्ही संघ भारत आणि अफगाणिस्तान आशियाई खेळ २०२६ च्या तयारीप्रमाणे बघतील. आशियाई खेळ जपानमध्ये होणार आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मालिकेनंतर दोन्ही संघ जपानसाठी रवाना होतील.२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट सामने २४ सप्टेंबर रोजी सुरू होतील. ‘अ’ गटामध्ये अफगाणिस्तानचा सामना जपान आणि नेपाळशी होईल.
इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), नूर रहमान (यष्टीरक्षक), सेदीकुल्ला अटल, दरविश रसूली, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदीन नायब, मोहम्मद नबी, राशीद खान, नांगयाल खरोती, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, अब्दुल्ला अहमदझई आणि नवीन-उल-हक.
राखीव खेळाडू – इजाझ अहमदझाई, शाहिदुल्ला कमाल आणि फरीद अहमद मलिक