yashasvi Jaiswal reacted on Asitha Fernando
क्रिकबझने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू आणि ज्येष्ठ कॉमेंटटेर हर्षा भोगले यांनी यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यातील वादावर आपले मत व्यक्त केले आहे. हर्षा भोगले म्हणाले की, ‘मला यशस्वीला एवढंच सांगायचं आहे की, हो, कदाचित गोलंदाजाने जे काही बोललं ते बोलायला नको होतं, पण जसं वागता तसंच स्वीकारायला हवं. जैस्वालने तिथून निघून जायला हवं होतं. त्याच्यात खूप प्रतिभा आहे, पण मुळात तो थोडा लढवय्या आहे. त्याला स्लेजिंग करण्यात आली. पण हे कसोटी क्रिकेट आहे आणि इथे सुद्धा स्लेजिंग करतात. मला वाटलं की तो थोडा जास्तच जवळ गेले होता.’
व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना यशस्वीने लिहिले, ‘यशस्वीने मर्यादा ओलांडली का?’ अशी कॅप्शन पोस्ट केली. हे वाचून यशस्वी जयस्वालने यावर प्रतिक्रिया दिली. ज्यामध्ये त्याने लिहिले की, ‘त्याने काय म्हटले हे तुम्हाला माहीत नसेल, तर कृपया कोणतेही मत तयार करु नका. जर कोण हद्द पार करत असेल, तर आपल्याला त्यांना सांगायला हवे की हा भारत आहे, जो लढेल आणि जशास तसे उत्तर देईल.’ ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोलंबो कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय डावाच्या १७ व्या षटकात ही घटना घडली, जेव्हा असिथा फर्नांडोने शेवटच्या चेंडूवर तीन चौकार देऊन यशस्वी जैस्वालला बाद केले. यशस्वी ३५ धावांवर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे परतत होता. आपली विकेट मिळाल्याचा आनंद साजरा करत असलेल्या असिथाने त्याला काहीतरी म्हटले, ज्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये झटापट झाली. या झटापटीदरम्यान, यशस्वीने आपले डोके फर्नांडोच्या कपाळाजवळ नेले. मात्र, इतर श्रीलंकन खेळाडू आणि कर्णधार धनंजय डी सिल्वा यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली.
श्रीलंकेचे गोलंदाजी प्रशिक्षक, रायन व्हॅन नीकर्क यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, अशा घटनांची चौकशी करणे हे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांचे काम आहे. ‘निर्णय घेण्याचे काम मी सामनाधिकारींवर सोपवतो.’ जर जैस्वाल दोषी आढळला, तर त्याला लेव्हल १ उल्लंघनाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते, ज्यामध्ये अधिकृत चेतावणी आणि त्याच्या सामना शुल्काच्या ५० टक्क्यांपर्यंत दंड आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्स दिला जाऊ शकतो.
IND vs SL: शुभमन गिलने WTC मध्ये उडवला ‘धुरळा’! अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार






