
Ishan Kishan broke virat kohli 10 year record
टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ८ विकेट्स राखून शानदार विजय नोंदवला. या विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार शतक झळकावले. अय्यरने १०२ धावांची धडाकेबाज नाबाद खेळी करत सामना जिंकून दिला. तसेच,, स्टार विकेटकीपर फलंदाज ईशान किशनने २७ चेंडूंमध्ये ३७ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीच्या जोरावर ईशानने टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठी कामगिरी केली आहे. या बाबतीत त्याने विराट कोहलीचा १० वर्षे जुना विक्रम मोडला आहे.
IND Vs WI 2nd T20: भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा T20 सामना पावसात वाहून जाणार? रांचीत हवामान करणार गेम
२८ वर्षीय ईशान किशन (Ishan Kishan ) गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आपल्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळीच्या जोरावर ईशानने टी-२० क्रिकेटमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. त्याने २०१६ मध्ये विराट कोहलीच्या नावावर असलेला १० वर्षे जुना विक्रम मोडला आहे. तो आता टी-२० क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. २०१६ मध्ये, कोहलीने ३१ टी-२० सामन्यांमधील २९ डावांमध्ये १६१४ धावा केल्या होत्या. या काळात त्याने ४ शतके आणि १४ अर्धशतके झळकावली होती.
मात्र, ईशानने आता २०२६ मध्ये हा टप्पा ओलांडला आहे. यावर्षी आतापर्यंत, ईशानने ४५ टी-२० सामन्यांच्या ४५ डावांमध्ये ३ १,६४४ धावा केल्या आहेत. यामध्ये १३ अर्धशतक आणि एक शतकाचा समावेश आहे. त्याने यावर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १,०४२ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त, त्याने आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) साठी १५ सामन्यांमध्ये ४०.१३ च्या सरासरीने ६०२ धावा केल्या आहेत.