IND vs AUS Match : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत प्रेक्षकांवर बंदी; BCCI चा मोठा निर्णय; काय आहे नेमकं कारण
Team India Bans Open Practice Session : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 6 डिसेंबरपासून कसोटी सामना सुरू होणार आहे. तरी सध्या टीम इंडियाचा जोरदार सराव सुरू आहे. या सराव सत्रादरम्यान प्रेक्षकसुद्धा पाहायला असतात, आता या प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. सराव सत्रात सुमारे 5,000 चाहत्यांनी हजेरी लावली आणि त्यांच्यापैकी काहींनी अपमानास्पद टिप्पण्या केल्या, असे वृत्त एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिले होते. त्यामुळे उर्वरित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी BCCI ने बंद दरवाजाआड सराव सत्र आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, BCCI ने अद्याप त्याची घोषणा केलेली नाही.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीत प्रेक्षकांवर बंदी
🚨 TEAM INDIA BANS OPEN PRACTICE SESSION…!!! 🚨
– Approx 5,000 fans tuned in for India's net session yesterday with some of them passing demeaning comments, so the BCCI have decided to go ahead with closed doors practice sessions for the rest of the Australian tour. (The Age). pic.twitter.com/QY3hTGZBjM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 4, 2024
दुसरी कसोटी ६ डिसेंबरपासून खेळवली जाणार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ६ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. ही डे-नाईट टेस्ट असेल, जी ॲडलेड ओव्हलवर खेळवली जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. या सामन्याचा नाणेफेक सकाळी ९ वाजता होणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 ची पहिली कसोटी पर्थ येथे खेळली गेली, जी टीम इंडियाने 295 धावांनी जिंकली. अशा स्थितीत भारतीय संघ या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.
या खेळाडूंवर लक्ष ठेवणार
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीत पाच खेळाडू आहेत ज्यांच्या कामगिरीवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पर्थ कसोटीत शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. दिवस-रात्र कसोटीत शतक झळकावणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. याशिवाय सर्वांच्या नजरा संघात पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्मावर आहेत. त्याच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा असतील. तसेच, बूम-बूम बुमराह गुलाबी चेंडूने ऑस्ट्रेलियावर कहर करू शकतो.