
IND vs AUS 3rd T20: India's 'beautiful' victory in Hobart; defeats Australia to level series 1-1
India vs Australia 3rd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट येथे खेळवण्यात आला. नाणेफेक गामणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने भारतासमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने वॉशिंग्टन सुंदरच्या ४९ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
वॉशिंग्टन सुंदरची स्फोटक खेळी
भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने या सामन्यात चेंडूने नाही तर बॅटने आपले योगदान दिले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना, त्याने कठीण काळात संघाला सावरण्याचे काम केले आणि फक्त २३ चेंडूत २१३ च्या स्ट्राईक रेट ४९ धावांची नाबाद खेळी करून भारताचा विजय निश्चित केला. तत्पूर्वी सलामीवीर अभिषेक शर्माने २५ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने देखील २४ धावांची खेळी केली. तिलक वर्मा यांनी २५ आणि जितेश शर्मा यांनी २२ धावा काढून योगदान दिले. अखेर भारताने ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियन गोलंदाज १८६ धावांच्या एकूण धावसंख्येचे रक्षण करताना कमजोर दिसून आले. नॅथन एलिसने ४ षटकांत ३६ धावांत ३ बळी घेतले. झेवियर बार्टलेट आणि मार्कस स्टेनिस यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.
ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात चांगली नसली तरी, टिम डेव्हिड आणि मार्कस स्टोइनिस यांच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर त्यांना एकूण १८६ धावा उभ्या करता आल्या. टिम डेव्हिडने १९४.७४ च्या स्ट्राईक रेटने ३८ चेंडूत ७४ धावा केल्या. तर मार्कस स्टेनिसने अखेर ३९ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. वरुण चक्रवर्तीने दोन आणि शिवम दुबेने एक बळी मिळवला.
हेही वाचा : PAK vs SA : आता ‘किंग’ कोहलीला विसरा! बाबर आझम राहील लक्षात, टी-२० क्रिकेटमध्ये रचला खास विक्रम
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू शॉर्ट, शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुह्नेमन.
बातमी अपडेट होत आहे….