
IND vs AUS 5th T20: Gill and Abhishek's partnership creates world record! Performed in T20I against Australia
Shubman Gill and Abhishek share partnership record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारताला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित करण्यात आले. या दरम्यान, पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला. तोपर्यंत भारताने एक गडी देखील न गमावता 4.5 ओव्हरमध्ये 52 धावा केल्या आहेत. या सामन्यात गिल आणि शर्मा यांनी भागीदारीचा एक विक्रम रचला आहे.
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या भारतीय सलामी जोडीने भारतीय संघाला शानदार सुरुवात करून दिली. अभिषेक शर्माने 13 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 23 धावा फटकावल्या आहेत तर गिलने 16 चेंडूत 6 चौकारांसह 29 धावा केल्या आहेत. त्यांनी मिळून 4.5 षटकात 52 धावा काढल्या आहेत. पावसाच्या हजेरीने सामना थांबला असला तरी, दोन्ही फलंदाजांकडून आधीच एक मोठा विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे.
शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20I मालिकेत ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करणारे फलंदाज ठरले आहेत. एकत्रितपणे, त्यांनी या मालिकेत आतापर्यंत एकूण 188 धावांची भागीदारी रचली आहे. असे करून, त्यांनी डेवाल्ड ब्रेव्हिस आणि टी स्टब्स यांचा विक्रम मोडीत काढला आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025 Trophy Controversy : ICC ने उचलले मोठे पाऊल! ट्रॉफी वाद सोडवण्यासाठी आखली ‘ही’ योजना
गॅबा येथील सामन्यात पावसामुळे व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला. ४.५ षटकांनंतर वीज पडली, ज्यामुळे खेळाडूंना मैदान सोडावे लागले आणि त्यानंतर काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. खेळ थांबण्यापूर्वी वेळी, भारताने एकही विकेट न गमावता ५२ धावा केल्या होत्या. दोन्ही सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आले. हे वृत्त लिहिताना, अभिषेक शर्माने १३ चेंडूत २३ धावा केल्या आहेत. तर शुभमन गिलने १६ चेंडूत २९ धावा करून नाबाद आहे. या मालिकेत भारतीय संघाने मालिकेत २-१ ने आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे, जर खराब हवामानामुळे हा सामना रद्द झाला तर मालिका भारतीय संघाच्या नावे होईल.