Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20I मधून अर्शदीप सिंगला डच्चू! फुटले वादाला तोंड; चाहत्यांनी व्यक्त केला  संताप

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची T20I मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंगला भारतीय अंतिम ११ मधून वगळण्यात आल्याने चाहत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 29, 2025 | 04:22 PM
IND vs AUS: Arshdeep Singh was ruled out of the first T20I against Australia! Controversy erupts; Fans express anger

IND vs AUS: Arshdeep Singh was ruled out of the first T20I against Australia! Controversy erupts; Fans express anger

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची T20I मालिकेला सुरुवात 
  • पहिल्या सामन्यातून अर्शदीप सिंगला डच्चू 
  • अर्शदीप सिंगला डच्चू दिल्याने चाहत्यांचा संताप 
IND vs AUS 1st T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची T20I मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज कॅनबेरा येथे खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या दरम्यान रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग आणि नितीश रेड्डी यांना भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देण्यात आला. या दरम्यान आता अर्शदीप सिंगला अंतिम ११ मधून वगळण्यात आल्याने चाहत्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा : ‘एमएस धोनीच्या चित्रपटामुळे प्रेरणा…’, ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटू पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला; एकदा वाचाच

चाहते संतापले..

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या व्यवस्थापनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयावर चाहत्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून अर्शदीप सिंगला संघात स्थान दिले गेले नाही तर हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. चाहते सोशल मीडियावर टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करताना दिसत आहेत.  काही चाहत्यांच्या प्रतिक्रिया खालीलप्रमाणे आहेत.

Arshdeep singh >>> farzi rana anyday 🤡 pic.twitter.com/QRtbK0gnNq — कृष्णा (@iiamkrshn) October 29, 2025
Wtf, You Are Playing Harshit Rana In The Playing 11 Before Arshdeep Singh, The Best Bowler Of India In T20i. Unreal Politics Bc 🤡. pic.twitter.com/xsQVCZHxip — Aufridi Chumtya (@ShuhidAufridi) October 29, 2025
This clown Gautam Gambhir’s has destroyed Indian team where merit has no place. – Dropped Jaiswal from T2OIs for his fvrt Gill,
– Dropped Arshdeep for his fvrt Harshit,
– Dropped Samson from opening in T2OIs,
– Dropped Samson from ODIs after 100,
– Sacked Rohit as captain,
-… pic.twitter.com/yRYZp1KrmN
— Rajiv (@Rajiv1841) October 29, 2025
Now , this actually is shameless behaviour from Gautam Gambhir .
He always keeps dropping Arshdeep from the playing 11 and gives long rope to Harshit Rana despite poor performances .
I mean this utter bullshit , how can someone not raise their voice against this shameful act… pic.twitter.com/wKcNL2D1gw
— Stumper (@TheStumpStory) October 29, 2025

पिच रिपोर्ट

मनुका ओव्हलमधील खेळपट्टी संतुलित असल्याचे मानले जाते. गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये मोठी मदत मिळते, तर फलंदाजांना धावा काढण्यासाठी क्रिजवर थोडा वेळ घालवावा लागतो. एकदा सेट झाल्यानंतर, फलंदाज येथे मोठे डाव खेळण्यास खेळू शकतात. तथापि, या खेळपट्टीवर लक्ष्यांचा पाठलाग करणे सोपे मानले जात नसून या मैदानावर आतापर्यंत एकूण ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी चार सामन्यांचा निकाल लागला आहे, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. येथील सरासरी धावसंख्या सुमारे १४४ धावा इतकी आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोन वेळा विजय मिळवला आहे आणि पाठलाग करणाऱ्या संघाला दोनदा यश मिळाले आहे.

हेही वाचा : ICC Ranking : कर्णधार शुभमन गिलला हिटमॅनने टाकले मागे! रोहित शर्मा जगातील नंबर 1 ODI फलंदाज

 भारताचा अंतिम संघ

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियाचा अंतिम संघ

मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, मिशेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन आणि जोश हेझलवूड.

पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे..

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात पावसाने व्यत्यय आणला असून सामना दोन वेळा थांबवण्यात आला आहे. पावसामुळे सामना १८ ओव्हरचा करण्यात आला आहे. त्यात भारताने ९.४ ओव्हर खेळत एक गडी गमावून ९७ धावा उभ्या केल्या आहेत. अभिषेक शर्मा( १९) लवकर बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादव नाबाद ३९ धावा तर शुभमन गिल नाबाद ३७ धावा केलेल्या आहेत.

Web Title: Ind vs aus fans angry after arshdeep singh was dropped from the first t20i against australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • Harshit Rana
  • IND VS AUS
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs SA 3rd T20I: धर्मशालामध्ये Hardik Pandya ची स्पेशल सेंच्युरी, ऐतिहासिक कारनामा करणारा पहिला भारतीय; रचला इतिहास
1

IND vs SA 3rd T20I: धर्मशालामध्ये Hardik Pandya ची स्पेशल सेंच्युरी, ऐतिहासिक कारनामा करणारा पहिला भारतीय; रचला इतिहास

IND vs SA 2nd T20 : ‘भारताची ही चूकच..’, कोच गौतम गंभीरच्या रणनीतीवर माजी भारतीय फलंदाजाचा निशाणा 
2

IND vs SA 2nd T20 : ‘भारताची ही चूकच..’, कोच गौतम गंभीरच्या रणनीतीवर माजी भारतीय फलंदाजाचा निशाणा 

IND vs SA 2nd T20 : जसप्रीत बुमराहच्या दहशतीला उतरती कळा! षटकारांच्यायाबाबत मागील पाच वर्षांची १० सामन्यांमध्ये झाली बरोबरी
3

IND vs SA 2nd T20 : जसप्रीत बुमराहच्या दहशतीला उतरती कळा! षटकारांच्यायाबाबत मागील पाच वर्षांची १० सामन्यांमध्ये झाली बरोबरी

IND vs SA 2nd T20 : दक्षिण आफ्रिकेचा भीम पराक्रम! भारतीय भूमीत ‘हा’ कारनामा करणारा जगातील ठरला पहिलाच संघ
4

IND vs SA 2nd T20 : दक्षिण आफ्रिकेचा भीम पराक्रम! भारतीय भूमीत ‘हा’ कारनामा करणारा जगातील ठरला पहिलाच संघ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.