
IND vs AUS: Where is the 'Hitman'? Rohit Sharma breaks Universe boss Chris Gayle's record in Sydney
Rohit Sharma breaks Chris Gayle’s record : सिडनीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २३७ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताने हे लक्ष्य ३८.३ षटकांत सहज पूर्ण केले. रोहित शर्मा हा भारतीय संघाच्या विजयाचा हीरो थळ. त्याने १२१ धावांची सामना जिंकवून देणारी नाबाद खेळी खेळली. त्यासोबत विराट कोहलीने देखील शानदार फलंदाजी करत ७१ धावांची खेळी केली.
या सामन्यादरम्यान भारताचा फलंदाज रोहित शर्माने एक मोठा विक्रम रचला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू क्रिस गेलला मागे टाकले आहे. त्याला “हिटमॅन” का म्हटले जाते हे त्याने आपल्या खेळीने पुन्हा एकदा सिद्ध केले. या सामन्यात रोहितने काही शानदार षटकार मारले, ज्यामुळे तो एका खास यादीत अव्वल स्थानी जाऊन पोहचला आहे.
रोहित शर्मा बनला सिक्सर किंग
रोहित शर्माने विदेशी भूमीवर मोठा कारनामा केला आहे. रोहित आता दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाहुण्या फलंदाज म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. त्याने क्रिस गेलला देखील आता मागे टाकले, ज्याने ८७ डावांमध्ये ९२ षटकार मारले होते. रोहित शर्माने आता ८६ डावांमध्ये ९३ षटकार मारत एक नवीन विक्रम रचला आहे. श्रीलंकेचा सनथ जयसूर्या ८९ षटकारांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी ८३ षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज विवियन रिचर्ड्स ५९ षटकारांसह पाचव्या स्थानी आहे.
रोहित शर्माचे शानदार शतक
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने आपली शानदार कामगिरी दाखवत शतक झळकावले, त्याने १२१ धावा केल्या. त्याने यापूर्वी १०५ चेंडूंचा सामना करून आपले शतक पूर्ण केले होते. रोहितने कारकिर्दीतील ३३ वे अर्धशतक झळकवले. त्याने १२५ चेंडूत नाबाद १२१ धावा काढल्या. यामध्ये त्याने १३ चौकार आणि ३ षटकार लगावले. रोहित शर्माच्या शतकामुळे भारताने सामन्यात सहज विजय मिळवला. रोहित शर्माला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर पुरस्कारासाथी निवडण्यात आले. तसेच त्याला मालिकावीर म्हणून देखील सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा : IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीचा ‘विराट’ कारनामा! सचिन-संगकारा जोडीचा विक्रम केला उद्ध्वस्त
याव्यतिरिक्त, दोन सामन्यांमध्ये शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीने शानदार पुनरागमन करत त्याने या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ८१ चेंडूत ७४ धावांचे योगदान दिले.