
IND VS AUS: Rohit Sharma's 'double' century in Sydney! 'This' special milestone reached in ODI cricket
हेही वाचा : IND vs AUS: नाद करा ‘हिटमॅन’चा कुठं! Rohit Sharma ने सिडनीमध्ये उनिव्हर्स बॉस क्रिस गेलचा विक्रम मोडला
भारतीय कर्णधार रोहित शर्माने सिडनी एकदिवसीय सामन्यात एक खास टप्प्याला गवसणी घातली आहे. त्याने सामन्यात दोन शानदार झेल घेतले आणि एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचे १०० झेल देखील पूर्ण केले. रोहितचा पहिला झेल हर्षित राणाच्या गोलंदाजीवर मिशेल ओवेनचा आला, जो फक्त एक धाव काढून बाद झाला. त्यानंतर त्याने प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर नाथन एलिसला माघारी पाठवले. जो १६ धावांवर बाद झाला. या दोन झेलांसह रोहितने एक ऐतिहासिक कामागिरी केली.
रोहित शर्मा भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक झेल घेणारा सहावा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी ही कामगिरी विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुरेश रैना या पाच भारतीय खेळाडूंनी केलेली आहे. या विक्रमासह, रोहितने देशातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये स्वतःची जागा सिद्ध केली.
Milestone unlocked 🔓 Rohit Sharma completes his 100th catch in ODIs 🙌#TeamIndia | @ImRo45 pic.twitter.com/OORJncEFJI — BCCI (@BCCI) October 25, 2025
या सामन्यात विराट कोहलीनेही आपले प्रभावी क्षेत्ररक्षण करून सर्वांना प्रभावित केले. त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू शॉर्ट आणि कूपर कॉनोली यांचे झेल घेत स्वतःसाठी आणखी एक विक्रम रचून गेला आहे. विराट कोहलीकडे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३३९ झेल आहेत. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिस (३३८ झेल) मागे टाकले आहे. कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.
हेही वाचा : IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीचा ‘विराट’ कारनामा! सचिन-संगकारा जोडीचा विक्रम केला उद्ध्वस्त
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने क्षेत्ररक्षण करताना दोन झेल घेऊन आपले १०० झेल देखील पूर्ण केले. त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या रोहित शर्माने शानदार शतक झळकावले, त्याने १२१ धावा केल्या. त्याने यापूर्वी १०५ चेंडूंचा सामना करून आपले शतक पूर्ण केले होते. रोहितने कारकिर्दीतील ३३ वे अर्धशतक झळकवले. त्याने १२५ चेंडूत नाबाद १२१ धावा काढल्या. यामध्ये त्याने १३ चौकार आणि ३ षटकार लगावले. एकूणच रोहित शर्माने या सामन्यात ‘डबल’ शतक लगावले आहे.