
IND vs AUS: 'Hitman' show in Adelaide! Rohit Sharma did a Bhim feat in cricket history; left 'this' legend behind
अॅडलेडमध्ये रोहित शर्माच्या खात्यात दोन धावा जोडल्या गेल्या आणि त्याने एक ऐतिहासिक विक्रम देखील रचला. रोहित आता ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या या कामगिरीने त्याच्या कारकिर्दीतील सातत्य आणि परदेशी खेळपट्ट्यांवर आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा पुरावा सादर केला आहे.
या सोबतच रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १००० पेक्षा जास्त एकदिवसीय धावा करणारा जगातील फक्त पाचवाच खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी वेस्ट इंडिजचे महान खेळाडू विव रिचर्ड्स आणि डेसमंड हेन्स आणि श्रीलंकेचे दिग्गज कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी हा कारानामा करून दाखवला आहे. आता रोहित शर्मा या महान खेळाडूंच्या यादीत जाऊन बसल आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने आणखी एका मोठा टप्प्याला गवसणी घातली आहे. एक धाव काढताच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला सलामीवीर म्हणून पिछाडीवर टाकले आहे. गांगुलीने सलामीवीर म्हणून ९१४६ धावा काढल्या होत्या आणि रोहितने आता हा टप्पा पार केला आहे. या कामगिरीसह, रोहित आता सर्वात यशस्वी एकदिवसीय सलामीवीरांच्या यादीत आणखी वर पोहचला आहे. सध्या, फक्त अॅडम गिलख्रिस्ट, ख्रिस गेल, सनथ जयसूर्या आणि सचिन तेंडुलकर त्याच्या पुढे असून रोहितने आता सचिननंतर सर्वात यशस्वी भारतीय सलामीवीर म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.
अॅडलेडमधील त्याच्या प्रभावी कामगिरीपूर्वी, पर्थ एकदिवसीय सामना रोहित शर्मासाठी निराशाजनक राहील आहे. रोहित ८ धावांवर बाद झाला. तथापि, त्या सामन्याचे महत्त्व त्याच्या कारकिर्दीतील ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना असल्याने वाढलेले दिसून आले होते. रोहित शर्मा असा पराक्रम करणारा पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी हे हा पराक्रम करण्याची किमया साधली आहे.