IND vs AUS: Gill Army arrives in Adele! A warm welcome from fans; Sweaty will be seen in the second match
India vs Australia 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ७ विकेट्सने पराभूत केले. आता भारतीय संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी अॅडलेमध्ये पोहचला आहे. पहिल्या सामन्यात अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली जवळजवळ २०० दिवसांनंतर एकदिवसीय संघात परतले आहेत. परंतु, पहिला सामना भारताला गमवावा लागला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाला ७ विकेट्सने पराभूत व्हावे लागले. या सामन्यात पावसामुळे वेळोवेळी सामन्यात व्यत्यय आला आणि ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस (DLS) पद्धतीने हा सामना सहज जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारत २६ षटकांत ९ बाद १३६ धावाच करू शकला. भारताकडून केएल राहुलने ३८ धावांची खेळी केली आणि अक्षर पटेलने ३१ धावा करून संघाला आधार दिला. ऑस्ट्रेलियाने ही लक्ष्य २१.१ षटकांत १३१ धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरागमन निराशाजनक राहिले. रोहित ८ धावांवर बाद झाला, तर विराट धाव न काढताच पॅव्हेलियनमध्ये परतला. या कामगिरीमुळे आता संघाला मोठ्या सामन्याची जबाबदारी कशी पार पाडायची याबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
भारतीय संघ आता २३ ऑक्टोबर रोजी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यासाठी अॅडलेडमध्ये मैदानावर उतरणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर हा सामना पुनरागमन करण्याची एक चांगली संधी असणार आहे. दिवाळीनंतर अॅडलेडमध्ये पोहोचलेल्या भारतीय क्रिकेटपटूंच्या चित्रात, काहींचे चेहरे आनंदी दिसत होते, तर काहींचे अजूनही पहिल्या सामन्याच्या आठवणींनी चेहऱ्यावर दिसून येत होत्या. परंतु, आता भारतीय संघ तिसऱ्या सामन्यापूर्वी अॅडलेडमध्ये त्यांची कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. विशेषतः लवकर विकेट गमावण्याची प्रवृत्ती थांबवून, आणि अनुभवी खेळाडूंकडून त्यांच्या प्रतिष्ठेनुसार कामगिरी करण्याची अपेक्षा करण्यात येईल.
हेही वाचा : कर्णधार सूर्यकुमार यादव शुभमन गिलचा T20 आशिया कप 2025 संघात समावेश करण्यास केला विरोध, पण…
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ या सामन्यात चांगली सुरुवात करणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. निवडकर्ते, चाहते आणि संघाला दोन्ही खेळाडूंवर विश्वास असून ते बऱ्याच काळानंतर एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरले आहेत. पहिल्या सामन्यात या अनुभवी खेळाडूंची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्या सामन्यात विराट आणि कोहली यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.