
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघाचे फार काही चांगले नशीब नाही. पहिला सामना पावसामुळे वाहून गेला होता तर दुसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला खराब कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला होता.या पराभवानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना २ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
दोन्ही संघ तिसऱ्या सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. भारताच्या संघाला तिसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे या मालिकेमध्ये भारताच्या संघाला बरोबरी करायची असल्यास आजचा तिसरा सामना जिंकणे गरजेचे आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये आता भारताच्या संघाला जिंकण्याची चांगली संधी आहे कारण दुसऱ्या सामन्यामधील स्टार या सामन्यात खेळणार नाही. तथापि, तिसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजी विभाग थोडा कमकुवत होईल, कारण त्यांचा स्टार गोलंदाज तिसऱ्या सामन्यात सहभागी होणार नाही.
IND W vs SA W : कशी असेल नवी मुंबईची खेळपट्टी? कोणाला होणार पिचचा फायदा…वाचा सविस्तर
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड तिसऱ्या सामन्यात खेळणार नाही. सुरुवातीला त्याला फक्त दोन सामन्यांसाठी संघात स्थान देण्यात आले होते. आगामी अॅशेस मालिकेच्या तयारीसाठी तो शेवटच्या तीन सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. तथापि, त्याच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजी युनिट कमकुवत होईल, कारण या स्टार गोलंदाजाने दुसऱ्या सामन्यात कहर केला आणि तीन अव्वल क्रमातील भारतीय फलंदाजांना बाद केले.
दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी केली. त्याने ४ षटकांत १३ धावा देत ३ बळी घेतले आणि त्याचा इकॉनॉमी रेट ३.२० होता. पॉवर प्लेमध्येच हेझलवूडने शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना बाद करत भारतीय फलंदाजी लाईनअपला उद्ध्वस्त केले. त्याच्या स्फोटक कामगिरीमुळे हेझलवूडला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
1-1 in sight for Team India! 👀 Went down fighting in Melbourne, will SKYBALL bounce back in style? 🔥#AUSvIND 3rd T20I 👉🏻 SUN, 2nd NOV, 12:30 PM on Star Sports Network and JioHotstar! pic.twitter.com/mKlON2dzLu — Star Sports (@StarSportsIndia) November 1, 2025
तिसऱ्या सामन्यात भारताला दमदार कामगिरीची आवश्यकता असेल. दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. अभिषेक शर्मा वगळता कोणत्याही फलंदाजाने लक्षणीय कामगिरी केली नाही. त्याने ३७ चेंडूत ५६ धावा केल्या, तर शुभमन गिलने ५, संजू सॅमसनने २, सूर्यकुमार यादवने १ आणि तिलक वर्मा यांनी ० धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल.