फोटो सौजन्य - नवराष्ट्र टीम
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषकाचा फायनल सामना आज खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ हे त्यांचे पहिला ट्रॉफीसाठी आज फायनल खेळताना दिसणार आहेत. भारतीय महिला संघाने सेमी फायनल च्या सामन्यांमध्ये सात वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे त्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चार वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आजचा सामना हा जेवढा भारतीय संघाला महत्त्वाचा आहे तेवढाच दक्षिण आफ्रिकेसाठी देखील हा सामना महत्त्वाचा असणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अजून महिला विश्वचषक अजून एकदाही जिंकलेला नाही भारतीय संघाची सध्या तरी तीच स्थिती आहे. भारताच्या संघाने रेकॉर्ड ब्रेकिंग रन चेस करून ऐतिहासिक विजय सेमी फायनल मध्ये नावावर केला आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणारा महिला विश्वचषक 2025 चा फायनल चा सामना हा नवी मुंबई मधील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानावर मागील सामना हा सेमी फायनल दोन चा सामना झाला या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने पहिले फलंदाजी करत 339 धावा केल्या होत्या. सेमी फायनल दोन च्या सामन्यात भारताच्या संघाने 339 धावांचे लक्ष हे 49 ओव्हर मध्ये पूर्ण करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. प्लीज सामन्यांमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना झाला होता या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताला पराभूत केले होते.
डी वाय पाटील या मैदानाची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल ठरते. कारण या मैदानावर बाउंड्री लहान असल्यामुळे चौकार आणि षटकार मारण्यात फार ताकद लागत नाही. त्याचबरोबर या खेळपट्टीवर रन बनवणे सोपे होते. आतापर्यंत या खेळपट्टीवर मागील दोन सामन्यांमध्ये 330 हून अधिक धावा बनवल्या आहेत. जर आजच्या सामन्यामध्ये जो संघ टॉस जिंकेल तो संघ पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
33 days, 30 games & countless records later…
A historic final awaits where a new champion will be crowned! 🏆 Less than 24 hours to go, are you cheering for the #WomenInBlue? 💙👇#CWC25 | #INDvSA Final SUN, 2 NOV, 2 PM on Star Sports Network & JioHotstar pic.twitter.com/OPQFb5FbyE — Star Sports (@StarSportsIndia) November 1, 2025
मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये पावसाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. फायनलच्या सामन्यामध्ये हवामानाच्या अंदाजानुसार असे म्हटले जात आहे की या दिवशी वातावरण हे गरम आणि दमट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर 25% पावसाची देखील संभावना असू शकते. त्याचबरोबर जर पाऊस आला तर पावसामध्ये थोडा उशीरही होऊ शकतो आणि जर त्या दिवशी मुसळधार पाऊस असल्यास रिझर्व दिनी हा सामना खेळवला जाणार आहे.
आयसीसीच्या नियमानुसार दोन नोव्हेंबरला फायनल चा सामना खेळवला जाणार आहे. जर हा सामना दोन नोव्हेंबर रोजी खेळवला गेला नाही तर दुसऱ्या दिनी हा सामना खेळवला जाईल. मागील सामन्यांमध्ये भारतीय संघाने काही बदल केले होते यामध्ये स्नेह राणाच्या जागेवर राधे यादव ला संघामध्ये स्थान दिले होते पण तिने मागील सामनेत फक्त एक विकेट घेऊन बरेच रन दिले होते त्यामुळे संघामध्ये बदल होणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






