
फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया
India vs Bangladesh U19 Toss Update : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही देश आज क्रिकेटच्या मैदानावर एकत्र आले आहे. भारत आणि बांग्लादेश अंडर 19 यांच्यामध्ये आज सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे. हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत आणि बांग्लादेश सामन्याचे नाणेफेक पार पडले. बांग्लादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये यूएसच्या संघाविरुद्ध सहज सामना जिंकला होता. तर या सामन्यामध्ये भारतीय संघासमोर बांग्लादेशचे मोठे आव्हान असणार आहे. बांग्लादेशचा आज पहिला सामना असणार आहे, तर भारतीय संघाचा हा दुसरा सामना असणार आहे. भारतीय संघासमोर आज पहिले फलंदाजीचे आव्हान असणार आहे त्यामुळे भारताच्या संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. मागील सामन्यामध्ये आयुष म्हात्रेने चांगली सुरूवात केली होती पण त्याने त्याचा विकेट लवकर गमावला होता.
बांगलादेश पहिल्यांदाच चालू विश्वचषकात खेळणार आहे. क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमधील खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप उपयुक्त आहे आणि गोलंदाजांना उसळी देते. सामन्यादरम्यान ढगाळ आकाश आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर केल्यापासून बांगलादेश क्रिकेट बोर्ड गोंधळात आहे. अभिज्ञान कुंडूने भारतीय संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये कमालीची खेळी खेळली होती त्यामुळे आज त्याच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे.
Bangladesh won the toss choose to field
No Aaron George beacuse of Tennis elbow #U19WorldCup pic.twitter.com/g7AkismKxS — RevSportz Global (@RevSportzGlobal) January 17, 2026
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), कनिष्क चौहान, हरवंश पंगालिया, आरएस अम्ब्रिस, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, खिलन पटेल
मोहम्मद रिफत बेग, झवाद अबरार, मोहम्मद अझीझुल हकीम तमीम (कर्णधार), कलाम सिद्दीक अलीन, मोहम्मद रिझान होसन, मो. फरीद हसन फैसल (विकेटकीपर), मो. समीयून बसीर रातुल, शेख पावेझ जिबोन, अल फहाद, साद इक्बाल, इक्बाल इक्बाल, शेख पावेज जिबोन.
बातमी अपडेट होत आहे…