IND Vs END: Shreyas Iyer has no place in the England tour, Gautam Gambhir ended the topic in four words...
IND Vs END : भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जिथे ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केलीय आहे. त्यामध्ये शुभमन गिलला भारताची कमान सोपावली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आगामी दौऱ्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. बीसीसीआयकडून इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात श्रेयस अय्यरचे नाव नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघ आयपीएल २०२५ च्या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
गौतम गंभीरला जेव्हा श्रेयस अय्यरबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्याने टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. तथापि, ३ जून रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या आयपीएलकहा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये देशाच्या सशस्त्र दलांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. याबद्दल गौतम गंभीरकडून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कौतुक करण्यात आले आहे.
इंग्लंड दौऱ्यापूर्वी शुभमन गिलला भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. २० जूनपासून लीड्समध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताच्या १८ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली, परंतु उत्तम फॉर्ममध्ये असणाऱ्या अय्यरला स्थान देण्यात आले नाहीत.
श्रेयस अय्यर हा आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १४ सामन्यांमध्ये ५१४ धावा केल्या आहेत. अय्यर पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. परंतु असे असून देखील त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले नाही. अय्यरला संघातून वगळण्यात आल्याने चाहत्यांसह माजी दिग्गजांना देखील आश्चर्य वाटले आहे.
बुधवारी, जेव्हा भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला इंग्लंड दौऱ्यासाठी अय्यरला भारतीय संघातून वगळण्यात आल्याबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा गंभीरचे उत्तर होते की, “मी निवडकर्ता नाही.” ही त्याचे उत्तर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हेही वाचा : RCB Vs LSG : Virat Kohli ला राग अनावर! Digvesh Rathi वर किंग कोहली भडकला, काचेवर बाटली मारली अन्.. पहा Video
अय्यरने २५ नोव्हेंबर २०२१ रोजी कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी कसोटी पदार्पण केले आणि पहिल्याच डावात त्याने शतक ठोकले होते. भारतासाठी त्याने शेवटची कसोटी गेल्या वर्षी विशाखापट्टणममध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. अय्यरने आतापर्यंत खेळलेल्या १४ कसोटी सामन्यांमध्ये ८११ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीमध्ये एक शतक आणि पाच अर्धशतके ठोकली आहेत.