फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका संपली आहे. टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही मालिका ३-० ने जिंकली. या मालिकेत टीम इंडियाची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्कृष्ट होते. शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल असा अनेक टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी दमदार फिल्डिंग स्किल्स दाखवले. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा आणि विराट कोहली हे त्यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जातात, परंतु या मालिकेत आणखी एका भारतीय खेळाडूने अद्भुत क्षेत्ररक्षण केले आहे आणि ‘इम्पॅक्ट फील्डर ऑफ द सिरीज’ पदक जिंकले आहे.
इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यरने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. मालिकेदरम्यान अय्यरने अनेक उत्कृष्ट झेल आणि अचूक थ्रो मारून टीम इंडियाला यश मिळवून दिले होते. ज्यामुळे अय्यरची आता ‘इम्पॅक्ट फील्डर ऑफ द सिरीज’ म्हणून निवड झाली आहे. उपकर्णधार शुभमन गिलने श्रेयसला ‘इम्पॅक्ट फील्डर ऑफ द सिरीज’ पदक वैयक्तिकरित्या प्रदान केले.
𝗗𝗿𝗲𝘀𝘀𝗶𝗻𝗴 𝗥𝗼𝗼𝗺 𝗕𝗧𝗦 | 𝗜𝗺𝗽𝗮𝗰𝘁 𝗙𝗶𝗲𝗹𝗱𝗲𝗿 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗢𝗗𝗜 𝗦𝗲𝗿𝗶𝗲𝘀
Series cleansweep for #TeamIndia ✅
Find Out Who bags the Fielding Medal 🎥 🔽#INDvENG | @IDFCFIRSTBank https://t.co/ismlU31kmx
— BCCI (@BCCI) February 13, 2025
या एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यरने फलंदाजीचे अद्भुत प्रदर्शन सादर केले. या मालिकेत त्याने २ अर्धशतकेही झळकावली. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत अय्यरने २ अर्धशतकांसह १८१ धावा केल्या. अय्यरने पहिल्या सामन्यात ५९ धावा, दुसऱ्या सामन्यात ४४ धावा आणि तिसऱ्या सामन्यात ७८ धावा केल्या. आता हा खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खळबळ माजवताना दिसणार आहे.
भारताचा संघ आता चॅम्पियन ट्रॉफीसाठी सज्ज होईल. यासाठी बीसीसीआयने संघाची फायनल घोषणा केली आहे. यामध्ये भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली युएईमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचे सामने खेळणार आहे. तर चॅम्पियन ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण भारताचा संघ सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानला जाणार नाही. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन ट्रॉफीच्या संघाबाहेर झाला आहे. त्याचबरोबर मोहम्मद सिराजला देखील संघामधून वगळण्यात आले आहे. यशस्वी जैस्वालला देखील संघामध्ये स्थान मिळाले नाही.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकिपर), हर्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शामी