IND vs ENG 3rd ODI Harshit Rana shines again dismisses England captain Jos Buttler and Harry Brook
IND vs ENG 3rd ODI : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्थान मिळवलेला भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने आपली चमक पुन्हा एकदा दाखवली आहे. त्याने लागोपाठ दोन विकेट घेत भारताला महत्त्वाच्या विकेट मिळवून दिल्या. सुरुवात अर्शदीपने केली, त्याने सलामी जोडी तंबूत पाठवली त्यानंतर कुलदीप यादवने 3 री विकेट घेत टॉम बॅन्टनला बाद केले त्यानंतर जो रूटला तंबूचा रस्ता अक्षर पटेलने दाखवला. त्यानंतर हर्षित राणाने भेदक गोलंदाजीच्या जोरावर सर्वात धोकादायक फलंदाज हेरी ब्रूक आणि कर्णधार जोस बटलरला लागोपाठ क्लिन बोल्ड केले.
हर्षित राणाची शानदार गोलंदाजी
Wicket number 2⃣ for Harshit Rana!
Harry Brook is out for 19.
Follow The Match ▶️ https://t.co/RDhJXhAI0N#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank https://t.co/D30F8UFfwM
— BCCI (@BCCI) February 12, 2025
भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडच्या संघाने गुडघे टेकल्याचे समोर आले आहे. अर्शदीप सिंगने आपल्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लड सुरुवातीला धक्के दिले. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लडचा संघ सलामी जोडी गेल्यानंतर टॉम बॅन्टन वगळता इतर सर्व फलंदाज गडगडले.
भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर यांनी शानदार गोलंदाजी करीत इंगल्डला पाणी पाजले. यानंतर बेहती गंगामध्ये हार्दिक पांड्यानसुद्धा आदिल रशिदला क्लिन बॉल्ड करीत हात धुवून घेतले.
इंग्लडचा संघ 357 धावांचा टार्गेट घेऊन मैदानात उतरले. त्यांची सुरुवात चांगली झाली, परंतु, त्यांना पहिला धक्का दिला अर्शदीप सिंगने त्याने अर्शदीप सिंगने सलामी जोडीली तंबूत पाठवले. फिल्प सॉल्ट आणि बेन डकेट यांनी 60 धावांची भागीदारी केली. पहिला इंग्लडला झटका बेन डकेटच्या रूपाने मिळाला. त्यानंतर फिल्प सॉल्ट आणि टॉम बॅन्टन यांनी 20 धावांची भागीदारी केली.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना धमाकेदार खेळी करीत 357 धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर शुभमन गील आणि विराट कोहली यांनी मोठी भागीदारी करीत संघाच्या धावसंख्येत मोठी भर टाकली. शुभमन गील आणि विराट कोहलीने धमाकेदार 116 भागीदारी केली. यामध्ये शुभमन गीलची शानदार शतकीय खेळी केली. शुभमन गीलने 112 धावांची मोठी भागीदारी केली. परंतु, विराट कोहली 78 धावांची खेळी करून बाद झाला.
विराट कोहलीने आज बऱ्याच दिवसांनंतर अर्धशतकीय खेळी केली त्याने 55 चेंडूत 52 धावांची खेळी केली. त्यानंतर श्रेयस अय्यरनेसुद्धा धमाकेदार खेळी 78 धावा केल्या, त्याने 64 चेंडूत 78 धावांची खेळी केली. त्यानंतर केएल राहुलने 40 धावांची खेळी केली. शेवटच्या फळीत खेळायला आलेल्या हार्दिक पांड्या, अक्षर पटेल हर्षित राणा यांनी वेगाने धावा करण्याच्या नादात विकेट दिल्या. भारतीय संघाने निर्णधारित 50 ओव्हरमध्ये 356 धावांची मोठी खेळी केली.