फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सामना सुरु व्हायला काही तास शिल्लक आहेत. भारताच्या संघासाठी या मालिकेमध्ये बरोबरी करण्याची आता शेवटची संधी असणार आहे. भारताच्या संघामधुन ऋषभ पंत हा बाहेर झाल्यानंतर आता नारायण जगदीसन याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. पण त्याआधी लाॅर्ड्स कसोटी सामन्यामध्ये जेव्हा पंतला दुखापत झाली होती त्यावेळी ध्रुव जुरेल याने विकेटकिपिंग केली होती. आता भारताचा संघ पाचव्या कसोटी सामन्यामध्ये कोणत्या विकेटकिपरला संधी देणार हे आता बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयने त्याच्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आता पुढील सामना हा ध्रुव जुरेल पक्के झाल्याचे मानले जात आहे. त्याला या मालिकेमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही पण त्याने पंतच्या जागेवर विकेटकिंपिग केली होती. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ध्रुव जुरेल याने सांगितले की मी फार उत्सुक आहे हा सामना खेळण्यासाठी कारण हा सामना संघासाठी फार महत्वाचा आहे.
IND vs AUS : Vaibhav Suryavanshi या तारखेला खेळणार पुढील सामना! वाचा U19 संघाचे संपुर्ण वेळापत्रक
त्यानंतर तो पुढे म्हणाला की मी माझ्या संघासाठी असे काय करु शकतो त्यामुळे हा सामना आम्ही जिंकु. ऋषभ पंत याने त्याला काही टिप्स दिल्या आहेत. या सामन्यामध्ये त्याची कामगिरी कशी राहणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर आणखी संघामध्ये कोणते खेळाडूंची एन्ट्री होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
३१ जुलैपासून सुरू होणारा पाचवा कसोटी सामना खूप महत्त्वाचा आहे कारण तो भारत आणि इंग्लंडमधील तीव्र स्पर्धात्मक मालिकेचा निकाल ठरवेल. इंग्लंड २-१ ने आघाडीवर आहे आणि २०१८ नंतर भारतावर पहिला मालिका विजय मिळवण्याकडे त्यांचे लक्ष आहे. दुसरीकडे, भारत मालिका २-२ अशी बरोबरी साधून अपराजित राहून मायदेशी परतण्याचा निर्धार करत आहे.
चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. मँचेस्टर कसोटीत भारताने जोरदार फलंदाजी करत चौथा कसोटी सामना अनिर्णित ठेवला. कर्णधार गिलनंतर, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतके झळकावली. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दुसऱ्या डावात तीन फलंदाजांनी शतके झळकावली. आता पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे.