Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK : भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणत्या संघाला मिळणार सुपर 8 चे तिकीट! आयसीसीचे नियम काय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एक हाय-व्होल्टेज विश्वचषक सामना कोलंबोच्या मैदानावर खेळवला जाईल. आतापर्यत श्रीलंकेमध्ये एकही सामना रद्द झाला नाही पण आज पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 15, 2026 | 06:20 PM
फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

T20 World Cup 2026 India vs Pakistan : भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना सुरू व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. भारताच्या संघाचा मागील काही वर्षापासून आंतरराष्ट्रिय क्रिकेटमध्ये दबदबा पाहायला मिळाला आहे. १५ फेब्रुवारी रोजी, ज्या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो सामना टी२० विश्वचषकात खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एक हाय-व्होल्टेज विश्वचषक सामना कोलंबोच्या मैदानावर खेळवला जाईल. आतापर्यत श्रीलंकेमध्ये एकही सामना रद्द झाला नाही पण आज पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

पाकिस्तानकडून झालेल्या सर्व नाट्यमय घडामोडींनंतर, अखेर या सामन्याला हिरवा कंदील मिळाला आहे, परंतु आता सामन्यावर पावसाचे ढग दाटून आले आहेत. श्रीलंकेच्या हवामान खात्याने जाहीर केलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामान बदलेल आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. परिणामी, चाहते अधिकच चिंतेत पडत आहेत. जर हा सामना झाला नाही तर याचा पॉइंट टेबलवर काय परिणाम होईल आणि आयसीसीचे नियम काय म्हणतात ते आपण समजावून सांगूया.

IND vs PAK : तारिकला तारे दाखवण्यासाठी भारताचा संघ सज्ज! पाकिस्तानी फिरकी गोलंदाजावर टीम इंडियान उपाय शोधला, सुर्याचा Video Viral

पावसाची शक्यता किती आहे?

कोलंबोमधील हवामान अंदाजानुसार, पावसाची शक्यता जास्त आहे. श्रीलंकेच्या हवामान विभागाने सांगितले आहे की दुपारी २ वाजेपर्यंत हवामान स्वच्छ राहील, परंतु त्यानंतर कोलंबोवर ढगांची चादर पसरण्यास सुरुवात होईल. १५ फेब्रुवारीच्या सुमारास आग्नेय बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे हवामानात अचानक बदल होऊ शकतो. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये पावसाची ९३ टक्के शक्यता आहे, परंतु रात्री ८ वाजल्यानंतर हवामान पुन्हा स्वच्छ होऊ शकते.

जर कोलंबोमधील सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुणावर समाधान मानावे लागेल. आयसीसीने ग्रुप स्टेज सामन्यांसाठी राखीव दिवस निश्चित केलेला नाही. अशा परिस्थितीत, भारत आणि पाकिस्तान दोघांचेही तीन सामन्यांतून प्रत्येकी ५ गुण असतील. चांगल्या नेट रन रेटमुळे टीम इंडिया पहिल्या स्थानावर राहील, तर पाकिस्तानला दुसऱ्या स्थानावर राहावे लागेल. टीम इंडियाचा पुढील सामना नेदरलँड्सविरुद्ध आहे, तर पाकिस्तान नामिबियाशी खेळेल. त्यामुळे, दोन्ही संघांना आपापले सामने जिंकून सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित करावे लागेल.

When India meets Pakistan, it’s never just a game! 🇮🇳🔥 With pride in every stride, #TeamIndia look to repeat history and make it 8-1 vs Pakistan! 👊💙 ICC Men’s #T20WorldCup 👉 #INDvPAK | SUN, 15th FEB, 6 PM pic.twitter.com/Y7Qd2REF8R — Star Sports (@StarSportsIndia) February 15, 2026

Web Title: If indiapakistan match is cancelled due to rain which team will get a to the super 8s what are the icc rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • cricket
  • IND VS PAK
  • India vs Pakistan
  • Sports
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Asia Cup आणि Asian Games साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; फातिमा सनाचं कमबॅक, ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक महामुकाबला
1

Asia Cup आणि Asian Games साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; फातिमा सनाचं कमबॅक, ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक महामुकाबला

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
2

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

IND vs PAK: चाहत्यांचा होऊ शकतो हिरमोड! एशियन गेम्समध्ये भारत-पाकिस्तान टक्कर Medal Match दरम्यान
3

IND vs PAK: चाहत्यांचा होऊ शकतो हिरमोड! एशियन गेम्समध्ये भारत-पाकिस्तान टक्कर Medal Match दरम्यान

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
4

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.