Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS ENG : इंग्लंडचा पराभव जवळजवळ पक्का! टेस्ट क्रिकेटमध्ये आजपर्यंत कधीही घडले नाही…

इंग्लंडच्या संघासमोर भारताच्या संघाने मोठे आव्हान उभे केले आहे. पण इंग्लंडच्या संघाने मागील सामन्यात देखील चांगली कामगिरी करून सामना जिंकला होता. आज त्यांच्यासमोर एक मोठे आव्हान असणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 06, 2025 | 10:47 AM
फोटो सौजन्य – X (Sachin Tendulkar)

फोटो सौजन्य – X (Sachin Tendulkar)

Follow Us
Close
Follow Us:

India vs England match update : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस खेळवला जाणार आहे यामध्ये भारताच्या संघाने दुसऱ्या डावामध्ये डाव घोषित करून इंग्लंड समोर 608 धावांचं लक्ष्य उभे केले आहे. चौथा दिनाच्या समाप्तीनंतर सुरू असलेल्या सामन्यात 90 ओवर मध्ये इंग्लंडच्या संघाला 536 धावांची गरज आहे. चौथ्या दिनी इंग्लंडच्या संघाने तीन विकेट्स गमावल्या आहेत.

इंग्लंडच्या संघासमोर भारताच्या संघाने मोठे आव्हान उभे केले आहे. पण इंग्लंडच्या संघाने मागील सामन्यात देखील चांगली कामगिरी करून सामना जिंकला होता. आज त्यांच्यासमोर एक मोठे आव्हान असणार आहे. इंग्लंडच्या संघाला हा सामन्यात जिंकण्यासाठी त्यांना असा पराक्रम करावा लागणार आहे जो आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये कोणीही केलेला नाही. त्यामुळे इंग्लंडचा जवळजवळ पराभव पक्का आहे असं मानलं जात आहे.

चौथ्या दिवसाच्या अखेरीस, इंग्लंडने दुसऱ्या डावात ३ विकेट गमावून ७२ धावा केल्या होत्या. त्यांचा सर्वात दिग्गज कसोटी क्रिकेट खेळाडू जो रूट देखील चौथ्या दिवशी फक्त ६ धावा करून बाद झाला. तथापि, हॅरी ब्रुक अजूनही १५ धावांवर नाबाद आहे, तर गेल्या सामन्यात १८४ धावांची नाबाद खेळी करणारा जेमी स्मिथ अद्याप फलंदाजीला आलेला नाही. 

IND vs ENG : ‘वैभव सुर्यवंशी…नाम तो सुना ही होगा’, टीम इंडियाने धुतलं ! भारतीय युवा संघाने जिंकली मालिका

आता पाचव्या दिवशी इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी ५३६ धावा करण्याचा मोठा पराक्रम करावा लागेल. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत कोणत्याही संघाने पाचव्या दिनी 500 रन बनवलेले नाहीत. आत्तापर्यंत क्रिकेटचा इतिहासामध्ये सर्वात मोठी धावसंख्या ही ही ऑस्ट्रेलियाच्या संघाने केली होती असे कांगारूच्या संघाने 2001 मध्ये 459 धावा केल्या होता. त्यानंतर सर्वात मोठी धावसंख्या चेज करण्यामध्ये वेस्ट इंडिजचा संघ आहे वेस्ट इंडिजच्या संघाने 2003 मध्ये 418 धावांचे टारगेट पूर्ण केले होते.

Stumps on Day 4 in Edgbaston! A magnificent day for #TeamIndia comes to an end 🙌 India need 7⃣ wickets on the final day to win the 2nd Test Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND pic.twitter.com/tttip5pAbg — BCCI (@BCCI) July 5, 2025

दुसऱ्या डावात आकाश दीप आणि मोहम्मद सिराज यांनी गोलंदाजीत टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. चौथ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने फक्त ७२ धावांवर ३ विकेट गमावल्या होत्या. यादरम्यान, गोलंदाजी करताना आकाश दीपने २ आणि मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली.

Web Title: Ind vs eng englands defeat is almost certain it has never happened in test cricket till now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • cricket
  • India vs England
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी
1

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान
2

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान

IND vs WI 1st Test Weather Report: अहमदाबाद कसोटी सामन्यावर पावसाचा गोंधळ; कसं असणार हवामान? वाचा एका क्लिकवर
3

IND vs WI 1st Test Weather Report: अहमदाबाद कसोटी सामन्यावर पावसाचा गोंधळ; कसं असणार हवामान? वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st Test Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व? वाचा पिच रिपोर्ट
4

IND vs WI 1st Test Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व? वाचा पिच रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.