फोटो सौजन्य – X
भारतीय युवा संघाचा एकदिवसीय मालिकेचा शेवटचा सामना पार पडला. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये एकीकडे कसोटी मालिका सुरू आहे, तर महिला संघाची T20 मालिका सुरू आहे. त्याचबरोबर दुसरीकडे भारतीय U19 संघाची एकदिवसीय मालिका काल पार पडली. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तिसरा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता आणि या सामन्यात भारताच्या संघाने विजय मिळवून मालिका जिंकली आहे.
भारताच्या संघाने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे, यामध्ये मोलाचे योगदान म्हणजेच आयपीएल 2025 चा सार फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्रा याचे राहिले. या दोघांनी कमालीचे कामगिरी केली आणि मोठी भागीदारी करत भारताच्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यांमध्ये भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेचा तिसरा सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भारताच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 363 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाला फक्त 308 धावा करता आल्या. भारतीय संघाच्या फलंदाजी बद्दल सांगायचं झाले तर टीम इंडियाचा U19 संघाचा कर्णधार आयुष मात्रे आणखी एकदा स्वस्तात बाद झाला. वैभव सूर्यवंशी याने संघासाठी 78 चेंडूंमध्ये 173 धावा केल्या, त्यामध्ये त्याने दहा षटकार आणि तेरा चौकार मारले.
Vaibhav Suryavanshi and Vihaan Malhotra’s centuries powered India U19 to a 55-run win over England U19, which gave them an unassailable 3-1 lead in the series.#ENGU19vINDU19 #EnglandU19 #IndiaU19 pic.twitter.com/OLtEbbQFQV — Circle of Cricket (@circleofcricket) July 5, 2025
विहान मल्होत्रा यांनी 121 चेंडूंमध्ये 129 धावा केल्या, यामध्ये त्याने तीन षटकार आणि 15 चौकार मारले. या व्यतिरिक्त अभिज्ञान कुंदू याने 23 धावांची खेळी खेळली या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. भारतीय संघाच्या गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर नमन पुष्पक याने संघासाठी तीन विकेट्स घेतले. अमरीश याने संघाला दोन विकेट्स मिळवून दिले. त्याचबरोबर कनिष्ठ चौहान आणि दीपेश या दोघांनी प्रत्येकी एक विकेट मिळवून दिला.