IND vs ENG: England dominate in Edgbaston Test! Harry Brook regains lead with century
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळवला जात आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असून एकेकाळी ८९ वर ५ विकेट्स गामावणाऱ्या इंग्लंड संघ आता पिछाडीवर जरी असला तरी मजबूत स्थितित दिसून येत आहे. हॅरी ब्रूक आणि जीमी स्मिथ यांनी इंग्लंडचा डाव सावरला आहे. या दोन्ही खेळाडूंनी शतके लगावून भारतीय गोलंदाजांना चांगलेच रडवले आहे. लीड्स कसोटीत केवळ १ धावेने शतक हुकलेल्या ब्रूकने यावेळी आपली चूक दुरुस्त करून आपली चूक दुरुस्त केली आहे. त्याने भारताविरुद्ध त्याचे पहिले शतक पूर्ण केलेया आहे. ब्रूकने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ९ व्यांदा शतक झळकावले आहे.
एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने धावांची बरसात केली. तर तिसऱ्या दिवशी इंग्लंडसाठी हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथने हे काम चोख केले. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस, २५ धावांवर ३ विकेट पडल्यानंतर ब्रूक मैदानावर फलंदाजीसाठी आला. तिसऱ्या दिवशी, त्याच्या समोर जो रूट आणि बेन स्टोक्स सलग चेंडूंवर पॅव्हेलियनमध्ये माघारी परतले. अशा परिस्थितीत, ब्रूकने जेमी स्मिथसह डाव हातात घेतला आणि भारतीय गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला.
हेही वाचा : Delhi Premier League : डीपीएलचा लिलावाची तारीख ठरली; फ्रँचायझींना मिळाले १.५ कोटी रुपयांचे पर्स
जीमी स्मिथने पहिल्या सत्रातच त्याचे शतक पूर्ण करून घेतले होते. परंतु, दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर ब्रूकने आपले शतक पूर्ण केले. ब्रूकने डावाच्या ५१ व्या षटकात चौकार मारून कसोटी कारकीर्दीतील त्याचे ९ वे शतक पूर्ण केले. शतक गाठण्यासाठी ब्रूकने १३७ चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये त्याने १२ चौकार आणि १ षटकार लगावला. यासह, इंग्लिश फलंदाजाने लीड्स कसोटी भरपाई केली. गेल्या सामन्याच्या पहिल्या डावात, ब्रूक ९९ धावांवर बाद झाला होता. त्याचे फक्त १ धावेने शतक हुकले होते. ९९ धावांवर प्रसिद्ध कृष्णामने त्याला बाद केले होते. योगायोगाने, या सामन्यात, त्याने प्रसिद्धच्याच चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले.
हेही वाचा : IND Vs ENG : जेमी स्मिथचे इंग्लंडकडून विक्रमी सर्वात जलद शतक; भारतीय गोलंदाजी निष्प्रभ
एजबॅस्टन येथे खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडकडून ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्मिथने भारतीय गोलंदाजांना चांगलेच झुलवले आहे. त्याने केवळ ८० चेंडूत भारताविरुद्धचे पहिले कसोटी शतक पूर्ण केले आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या ४७ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चौकार मारून त्याने आपले पहिले शतक साजरे केले. त्याने ८० चेंडूत शतक ठोकून एक खास कामगिरी केली आहे. भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा तो पहिलाच इंग्लंडचा खेळाडू ठरला आहे. यासह, तो इंग्लंडचा सर्वात जलद कसोटी शतक करणारा चौथा खेळाडू ठरला आहे.