डीपीएल ट्रॉफी (फोटो-सोशल मीडिया)
Delhi Premier League : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) ने दिल्ली प्रीमियर लीग (डीपीएल टी२०) च्या सीझन-२ साठी खेळाडूंच्या लिलावाचे नियम आणि रचना अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. दिल्ली प्रीमियर लीगचा लिलाव ६ जुलै रोजी दिल्लीमध्ये (पुरुष) आणि ७ जुलै रोजी (महिला) होणार आहे, ज्याचे थेट प्रक्षेपण फॅनकोडवर दाखवले जाणार आहे. यावेळी हा हंगाम पूर्वीपेक्षा अधिक स्पर्धात्मक आणि भव्य पद्धतीने आयोजित केला जाणार आहे.
एक ऐतिहासिक पाऊल टाकत डीडीसीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, लिलावात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा असणार नाही. याचा अर्थ असा आहे की १६ वर्षांखालील खेळाडूंपासून ते अनुभवी खेळाडूंपर्यंत सर्वांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची समान संधी मिळणार आहे. भविष्यातील क्रिकेट स्टार बाहेर आणण्याच्या आणि सर्व वर्गातील खेळाडूंना समान रीतीने सामावून घेण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी डीडीसीएकडून डीपीएल टी२० लीगमध्ये ८ संघांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या हंगामात या लीगमध्ये ६ संघ होते पण या हंगामात आणखी दोन संघांचा समावेश केला गेला आहे. सर्व संघांच्या फ्रँचायझींना १.५ कोटी रुपयांची पर्स देण्यात आली आहे. या हंगामात लिलाव प्रक्रियेत बदल करण्यात आला सन काही नवीन नियम आणण्यात आले आहेत. लिलावाचे संपूर्ण नियम पुढील प्रमाणे असणार आहेत.
प्रत्येक फ्रँचायझी एका खेळाडूला कायम ठेवू शकणार आहे. फ्रँचायझी कोणत्याही श्रेणीतील खेळाडू राखते, खेळाडूच्या श्रेणीनुसार त्याच्या लिलाव पर्समधून वजावट केली जणारया आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या संघाने मार्की खेळाडू राखला असेल तर २१ लाख रुपये वजा करण्यात येतील. तर अ श्रेणीतील खेळाडूंसाठी १० लाख, ब श्रेणीतील खेळाडूंसाठी ४.५ लाख आणि क श्रेणीतील खेळाडूंसाठी १.५ लाख रुपये वजा करण्यात येणार आहेत.
हेही वाचा : IND Vs ENG : जेमी स्मिथचे इंग्लंडकडून विक्रमी सर्वात जलद शतक; भारतीय गोलंदाजी निष्प्रभ
देशातील काही सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान क्रिकेटपटू देखील या लिलावात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. पुरुष खेळाडूंच्या यादीमध्ये ऋषभ पंत, इशांत शर्मा, आयुष बदोनी, हर्षित राणा, मयंक यादव, सुयश शर्मा, अनुज रावत सारखे अनेक आयपीएल खेळाडू असणार आहेत, जे डीपीएलला एका नवीन स्तरावर घेऊन जाण्यास मदत करतील.