IND Vs ENG: Jamie Smith creates history! He did 'this' feat for England; became the first wicketkeeper batsman to do so
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी कसोटी बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळी जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ४०७ धावांवर गारद करून १८० धावांची आघाडी मिळवली होती. तत्पूर्वी या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज जेमी स्मिथने एक मोठा पराक्रम केला आहे. त्याने पहिल्या डावात नाबाद १८४ धावांची खेळी केली आहे. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात जेमी स्मिथने अॅलेक स्टीवर्टचा विक्रम मोडीत काढला आहे.
जेमी स्मिथ इंग्लंडसाठी ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. त्याने १७४ धावा करताच अॅलेक स्टीवर्टचा विक्रम मोडला. आता जेमी स्मिथ सर्वाधिक धावा करणारा इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. २८ वर्षांनंतर जेमी स्मिथने हा विक्रम मोडीत काढला आहे. तो आता इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा पहिला विकेटकीपर फलंदाज म्हणून नवा विक्रम रचला आहे.
२४ ते २८ जानेवारी १९९७ दरम्यान ऑकलंडमधील ईडन पार्क येथे इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात, स्टीवर्टने पहिल्या डावात इंग्लंडसाठी नंबर ३ वर फलंदाजीला आल्यावर त्याने २७७ चेंडूत १७३ धावा केल्या होत्या. इंग्लंडसाठी एकूण चार यष्टिरक्षक-फलंदाजांनी इंग्लंडसाठी कसोटी सामन्याच्या एका डावात तीन वेळा १५० पेक्षा अधिक धावा केल्या आहे. या यादीत जेमी स्मिथ, अॅलेक स्टीवर्ट, जॉनी बेअरस्टो आणि जोस बटलर या फलंदाजांचा समावेश आहे.
टेस्ट क्रिकेट सामन्यात यष्टिरक्षक-फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम झिम्बाब्वेचा दिग्गज अँडी फ्लॉवर यांच्या नावावर जमा आहे. २५ ते २९ नोव्हेंबर २००० दरम्यान नागपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या भारत-झिम्बाब्वे कसोटी सामन्यात, फ्लॉवर दुसऱ्या डावात ४४४ चेंडूत २३२ धावा काढून नाबाद राहिला होता. एकूण नऊ यष्टिरक्षक-फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये १० द्विशतके लागवली आहेत.
हेही वाचा : भारताचे Olympics 2036 च्या यजमानपदासाठी प्रयत्न! IOC ने दिल्या ‘या’ गोष्टी सुधारण्याच्या सूचना..
इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज स्मिथने भारताविरुद्धच्या पहिल्या डावात २०७ चेंडूंचा सामना करत १८४ धावा केल्या आहेत. त्यात त्याने २१ चौकार आणि ४ षटकारांची बरसात केली. स्मिथने ८० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. भारताविरुद्ध कसोटी सामन्यात सर्वात जलद शतक करणारा तो इंग्लंडचा पहिला फलंदाजही ठरला आहे.