IND vs ENG 4th Test: KL Rahul's big performance in the fourth Test match; He earned a place in the 'this' row of Gavaskar-Tendulkar...
IND vs ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील ३ सामने खेळून झाले आहेत. या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत फलंदाजी करताना दिसत आहे. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही जोडी मैदानात आहे. चौथ्या दिवसाचे पहिले सत्र संपले असून या सत्रात भारतीय संघाने एकही विकेट न गमावता ७८ धावा केल्या आहेत. यादरम्यान, भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल नाबाद ४० आणि यशस्वी जयस्वाल नाबाद ३६ धावांसह खेळत आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने या दरम्यान मोठी कामगिरी केली आहे. राहुल इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये १००० धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज बनला आहे.
हेही वाचा : अखेर संसदेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक सादर! आता BCCI ही येणार कायद्याच्या चौकटीत; काय आहेत तरतुदी..?
बुधवार (२३ जुलै) रोजी ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत आहे. भारताकडून सलामीवीर म्हणून केएल राहुल खेळत आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात भारताचा दबदबा दिसून आला आहे. या सत्रात राहुलने सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध १००० कसोटी धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज बनून विक्रमी कामगिरी केली आहे. केएल राहुलने क्रिस वोक्सच्या चेंडूवर चौकार मारून ही कामगिरी करून दाखवली आहे.
इंग्लंडमध्ये भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम महान फलंदाज तेंडुलकरच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. त्याने १७ सामन्यांमध्ये चार शतके आणि आठ अर्धशतकांच्या मदतीने एकूण १५७५ धावा फाटकावल्या आहेत. तर राहुल द्रविडने १३ कसोटी सामन्यांमध्ये १३७६ धावा केल्या आहेत. तसेच लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी १६ कसोटी सामन्यांमध्ये ११५२ धावा केल्या आहेत.
हेही वाचा : IND vs ENG 4th Test : ‘तो झहीर, बुमराहप्रमाणे वेगवान…’,पदार्पणवीर अंशुल कंबोजबाबत आर अश्विनचे कौतुकाचे बोल..
विराट कोहलीने इंग्लंडमध्ये १००० पेक्षा जास्त कसोटी धावा काढल्या आहेत. परंतु १२ मे २०२५ रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या माजी भारतीय कर्णधाराने इंग्लंडविरुद्ध १५ सामन्यांव्यतिरिक्त न्यूझीलंड (जून २०२१ मध्ये) आणि ऑस्ट्रेलिया (जून २०२३ मध्ये) विरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळलेला आहे. याशिवाय, चालू मालिकेत दोन शतके साकारणारा केएल राहुल मँचेस्टर सामन्यात २८ धावा करताच इंग्लंडमध्ये १००० कसोटी धावा करणारा गावस्करनंतर दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. राहुलच्या आधी फक्त सुनील गावस्कर यांनीच ही कामगिरी केली होती.