आर आश्विन आणि अंशुल कंबोज(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या सामन्यातील चौथा सामना मँचेस्टर येथे आजपासून खेळवला जात आहे. इंग्लंडने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यापूर्वी इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. भारताने सामन्याच्या दिवशी प्लेइंग ११ संघ जाहीर केला आहे. या सामन्यात भारताकडून अंशुल कंबोजने पदार्पण केले आहे. या पदार्पणवीर कंबोजबद्दल माजी भारतीय ऑफस्पिनर आर अश्विनने मोठे विधान केले आहे.
झहीर खान आणि जसप्रीत बुमराहसारखा वेगवान गोलंदाज म्हणून अंशुल कंबोजचे वर्णन माजी भारतीय ऑफस्पिनर आर अश्विनने केजे. त्याने कंबोजचे कौतुक केले. तो त्याच्या क्षेत्रात कुशल खेळाडू नाही तर त्याच्या रणनीतीची चांगली समज आहे. गेल्या आठवड्यात मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी आणि वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि अर्शदीप सिंग यांच्या जोडीला दुखापत झाल्यानंतर कंबोजचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.
हेही वाचा : PHOTOS : मँचेस्टर कसोटीत पदार्पण करणारा अंशुल कंबोज कोण आहे? रणजी ट्रॉफीत आहे ऐतिहासिक कामगिरी..
अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनल ‘अश की बात’ वर म्हटले आहे की, अंशुलबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो त्याची रणनीती चांगल्या प्रकारे समजतो. मी अनेक वेगवान गोलंदाज पाहिले आहेत, जर तुम्ही त्यांना त्यांच्या रणनीतीबद्दल विचारले तर ते फक्त असे म्हणतात की ते स्वतःला व्यक्त करू इच्छितात आणि खेळाचा आनंद घेऊ इच्छितात. पण अंशुल त्याची रणनीती चांगली समजतो आणि मैदानावर ती कशी राबवायची हे देखील जाणतो. बहुतेक वेगवान गोलंदाजांमध्ये ही गुणवत्ता नसते. झहीर खान हा एक वेगवान गोलंदाज होता जो त्याची रणनीती चांगल्या प्रकारे समजत असे आणि ती चांगल्या प्रकारे अंमलात आणत असे. तो एक अद्भुत खेळाडू होता. अलिकडच्या काळात, जस्सी (बुमराह) हा एक खेळाडू आहे जो रणनीती चांगल्या प्रकारे समजतो आणि ती चांगल्या प्रकारे अंमलात आणतो. अंशुल देखील असाच एक खेळाडू आहे.
हेही वाचा : IND vs ENG 4th Test : इंग्लिश संघाने जिंकला टॉस, घेतला गोलंदाजीचा निर्णय; भारत करणार फलंदाजी
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग ११
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ११
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स आणि जोफ्रा आर्चर.