IND vs ENG: Yashasvi Jaiswal's wicket and England captain's huge celebration, Stokes' joy is in the sky; Watch Video
India and England 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळला जात आहे. सामन्यापूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत हा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात भारतचा सलामीवीर यशस्वी जयस्वालचे शतक हुकवले आहे. जयस्वाल ८७ धावांवर माघारी परतला. त्याला ८७ धावांवर बेन स्टोक्सने आपला बळी बनवले. जयस्वाल बाद होताच बेन स्टोक्सची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती. त्याचा जल्लोष आता चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. त्याआधी दोघांमध्ये काही अनबन झाली होती.
यशस्वी जयस्वाल १०६ चेंडूत ८७ धावा काढत खेळत होता. तेव्हा बेन स्टोक्स गोलंदाजी करत होता. त्याचा एक चेंडू जयस्वालच्या बॅटच्या कडेला लागला आणि थेट जाऊन इंग्लंडचा विकेटकीपर-फलंदाज जेमी स्मिथच्या ग्लोजमध्ये स्थिरावला आणि जयस्वाला माघारी जावे लागले. त्यानंतर स्टोक्स आक्रमकपणे जल्लोष करताना दिसून आला. त्याच्या जल्लोषाची क्लिप आता इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होत आहे.
स्टोक्सने जयस्वालच्या ८७ धावांच्या आक्रमक खेळीचा शेवट केला. त्यासोबत त्याने जयस्वाल आणि शुभमन गिलमधील तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी देखील मोडली. इतकेच नाही तर जयस्वालला स्टोक्सने अनेक फलंदाजी विक्रम मोडण्यापासून देखील रोखले. जर जयस्वाल स्थिर राहिला असता शतक झळकावले असते, तर त्याने इंग्लंडच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात शतके झळकावण्याच्या सौरव गांगुलीच्या फलंदाजीच्या विक्रमाची बरोबरी साधली असती.
Jaiswal swings at one outside off and nicks it to Jamie Smith!
Ben Stokes loved that one ❤️
🇮🇳 1️⃣6️⃣1️⃣-3️⃣ pic.twitter.com/1utciXOvgF
— England Cricket (@englandcricket) July 2, 2025
गांगुलीने २० जून १९९६ रोजी लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध भारतासाठी कसोटी पदार्पण केले आणि पहिल्या डावात १३१ धावा काढल्या होत्या. तसेच नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील गांगुलीने पहिल्या डावात १३६ धावा केल्या होत्या
भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात, इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर भारत प्रथम फलंदाजीला मैदानात आला. भारताची सुरवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर केएल राहुल २६ चेंडू खेळून २ धावांवर बाद झाला. त्याला वोक्सने बाद केले. त्यानंतर सलामीवीर यशस्वी जयस्वालला साथ देण्यासाठी ३ नंबरवर करुण नायर फलंदाजीसाठी आला. दोघांनी काही काळ डाव सांभाळला, परंतु करुण नायर ३१ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल मैदानात आला आणि त्याने जयस्वालसोबत धावा जोडायला सुरवात केली. जयस्वालने ५९ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर त्याला ८७ धावांवर बेन स्टोक्सने माघारी पाठवले. जयस्वालनंतर ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला तो २५ धावा करून शोईब बशीरचा ठरला. पंतनंतर संघात स्थान मिळालेला नितीश कुमार रेड्डी मैदानावर आला मात्र १ धाव काढून बाद झाला. त्यानंतर आता रवींद्र जाडेजा फलंदाजीसाठी आला आहे. आता जडेजा २ आणि गिल ६४ धावांवर खेळत आहे. भारताने ५ विकेट्स गमावून २१८ धावा केल्या आहेत.