
भारत विरूद्ध जपान कधी आणि कुठे पाहता येणार सामना (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
भारत विरुद्ध जपान सामन्याचे फॅनकोडवर थेट प्रक्षेपण
क्रीडा स्ट्रीमिंग सेवा फॅनकोडने २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि जपान यांच्यातील सामन्यासाठी भारतातील विशेष डिजिटल स्ट्रीमिंग हक्क मिळवले आहेत. भारतीय क्रिकेट चाहते हा सामना ओटीटी प्लॅटफॉर्मवर थेट पाहू शकतील. सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सुरू होईल. फॅनकोडने भारतातील स्ट्रीमिंग हक्क क्रीडा विपणन कंपनी आयटीडब्ल्यू युनिव्हर्सकडून मिळवले आहेत.
टीव्ही चॅनल अद्याप निश्चित नाही
भारतीय चाहत्यांसाठी डिजिटल स्ट्रीमिंगची पुष्टी झाली आहे, परंतु दूरदर्शन प्रसारक अद्याप निश्चित झालेला नाही. सोनी, स्टार आणि झी यांसारख्या प्रमुख टीव्ही नेटवर्क्ससोबत वाटाघाटी सुरू आहेत. पुढील २४ तासांत हा करार अंतिम होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक डिजिटल हक्कांसाठीही मोठी व्यावसायिक आवड दिसून येत आहे. यूट्यूब, नेटफ्लिक्स आणि जिओहॉटस्टारसारखे प्रमुख आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म जगभरातील डिजिटल वितरणासाठी बोली लावण्याचा विचार करत आहेत.
Asian Games 2026: हरमनप्रीतच्या संघासमोर जपानचे आव्हान; श्रेयसच्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरी
पहिल्यांदाच जपानविरूद्ध सामना
भारताने आतापर्यंत अनेक देशांच्या विरूद्ध क्रिकेटचे सामने खेळले आहेत. मात्र जपान पहिल्यांदाच भारताविरूद्ध क्रिकेट सामना खेळणार आहे. बऱ्याच दृष्टीने हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे. हा सामना पहिलाच असल्यामुळे यासाठी चॅनलमध्येदेखील चढाओढ दिसून येत आहे. दरम्यान प्रेक्षकांना नक्कीच या सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय जपानीच टीम कशी खेळणार हादेखील प्रश्न आहेच. भारतीय टीम नक्कीच प्रभावी आहे. मात्र कोणत्याही नव्या टीमला कमी लेखण्याची चूक भारतीय क्रिकेट टीम करणार नाही हेदेखील तितकंच खरं आहे.