फोटो सौजन्य - Hockey India सोशल मीडिया
भारताचा महिला संघ या ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरला नाही त्यामुळे हॉकीसाठी मोठी निराशा होती तर दुसरीकडे पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक नावावर केले. आता सध्या बिहार महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 लढत सुरु आहे. बिहार महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये भारताने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या महिला हॉकी संघानेही राजगीर येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. हा सामना मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे. बिहार महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना चीन आणि मलेशिया यांच्यात होणार आहे. हा सामनाही मंगळवारीच होणार आहे.
बिहार महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या गुणतालिकेमध्ये भारतीय महिला संघ अव्वल स्थानावर आहे. यामध्ये भारताच्या संघाचे पाच सामने झाले आहेत यामध्ये टीम इंडियाने सर्व सामने जिंकून पहिल्या स्थानावर विराजमान आहे. दुसऱ्या स्थानावर गुणतालिकेमध्ये चीन आहे. चीनचे पाच साखळी सामने झाले आहेत. यामध्ये चीनने चार सामने जिंकले आहेत तर एक सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिसऱ्या स्थानावर मलेशियाच्या संघ आहे. मलेशियाचे या स्पर्धेत पाच साखळी सामने झाले आहेत. यामध्ये त्यांनी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
चौथ्या स्थानावर गुणतालिकेमध्ये जपानचा संघ आहे. जपानने फक्त एक सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर दोन सामने ड्रॉ झाले आहेत आणि दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
🏑🔥 Semi-Final Knockout Round | Bihar Women’s Asian Champions Trophy Rajgir 2024
The stage is set, and the stakes couldn’t be higher! 🌟 Teams are leaving it all on the field in a do-or-die battle for a spot in the knockout rounds. Who will rise, and who will falter? 🏆
Drop… pic.twitter.com/0d6Lv902TJ— Hockey India (@TheHockeyIndia) November 19, 2024
भारतीय महिला हॉकी संघ सलीमा टेटे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खेळत आहे. सलीमासोबतच गोलरक्षक सविता, ज्योती, सुशीला चानू आणि नेहा यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली. शर्मिला आणि संगीता कुमारी यांनीही आपली ताकद दाखवून दिली आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. टीम इंडियाने ग्रुप मॅचमध्ये जपानचा खराब पराभव केला होता. भारताने एका सामन्यात 0-3 असा विजय मिळवला होता.
बिहार महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चा पहिला उपांत्य सामना चीन आणि मलेशिया यांच्यात होणार आहे. ही स्पर्धा टक्कर देणारी ठरू शकते. या सामन्यापूर्वी पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी कोरिया आणि थायलंड यांच्यात सामना होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 20 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी होणार आहे. हे सर्व सामने बिहारमधील राजगीर येथे होणार आहेत.
भारतीय संघ : सविता पुनिया, बिचू देवी खरीबम, उदिता, ज्योती, वैष्णवी विठ्ठल फाळके, सुशीला चानू, इशिका चौधरी, नेहा, सलीमा टेटे, शर्मिला देवी, मनीषा चौहान, सुनीलिता टोप्पो, लालरेमसियामी, नवनीत कौर, प्रीती कुमारी, प्रीती कुमारी, संगीता दुबे. , सौंदर्य डुंगडुंग
जपान संघ: माई फुकुनागा, मियु हसेगावा, मयुरी होरिकावा, साया इवासाकी, हारुका कावागुची, जुनोन कावाई, शिहो कोबायाकावा, यू कुडो, मेई मात्सुनामी, माइको मिकामी, मिझुकी मोरिता, हिरोका मुरायामा, सायहो नगाता, नत्सुमी ओशिमा, हनामी सायतो, अयाना तामुरा, माहोकाओना