
IND vs NZ 1st T20I: 'Playing in India before the World Cup....' New Zealand captain Santner expressed his feelings.
IND vs NZ 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. आज नागपूर येथील जामठा मैदानावर हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, टी-२० विश्वचषकापूर्वी भारतात खेळण्याचे महत्त्व अधिक आहे. हा दौरा आमच्या संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर यांनी व्यक्त केले. आजपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड संघ नागपुरात दाखल झाला असून मंगळवारी त्यांच्या संघाने जामठ्यावरील मैदानावर कसून सराव केला.
सरावापूर्वी कर्णधार मिशेल सँटनरने पत्रकाराशी संवाद साधला. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणारा विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यावेळी बोलताना सँटनर म्हणाला, आम्हाला भारतात खेळायला खूप आवडते. टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय परिस्थितीत एका मजबूत संघाचा सामना करण्याची संधी मिळणे आमच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे. सँटनरने अष्टपैलू डॅरिल मिशेलने वनडेत केलेल्या खेळीचे कौतुक केले. तो म्हणाला, डॉरिल आपला उत्कृष्ट एकदिवसीय फॉर्म या मालिकेतही कायम ठेवेल अशी आशा आहे. भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये ८४, नाबाद १३१ आणि १३७धावा करून न्यूझीलंडच्या २-१ मालिकेच्या विजयात मिशेलने महत्त्वाची भूमिका बजावली.
डॅरिलला सुरुवातीला फिरकी गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करावा लागला. पण त्याने अविश्वसनीय कठोर परिश्रम केले आणि आता तुम्हाला त्याच्या कठोर परिश्रमाचे परिणाम दिसू शकतात. तो फिरकी गोलंदाजांना चांगला खेळतो. आशा आहे की, तो टी-२० मध्येही अशीच कामगिरी करेल. मिचेलचा भारताविरुद्धचा अलीकडील एकदिवसीय विक्रम सँटनरच्या अपेक्षा स्पष्ट करतो. मिचेलने गेल्या काही वर्षांत भारताविरुद्ध सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, विविध परिस्थितीत मोठे धावा केल्या आहेत. स्पिन चांगला खेळण्याची आणि मधल्या षटकांमध्ये खेळावर नियंत्रण ठेवण्याची त्याची क्षमता त्याला न्यूझीलंडच्या सर्वात महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक बनवते.
टी-२० विश्वचषकाला अद्याप विलंब आहे. भारतात ही स्पर्धा होत असल्याने या मालिकेचा आणि येथील परिस्थितीचा आम्हाला फायदा होईल. परंतु सध्या आमचे लक्ष या मालिकेवर आहे. ही मालिका कशी जिंकता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे. मालिका जिंकण्यासाठी तसेच वर्ल्डकची तयारी म्हणून सर्व खेळाडूंना यात संधी देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मिशेल सँटनरने सांगितले.