Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: शेवटच्या क्षणी फिरला डाव! किवींनी टीम इंडियाचा खेळ केला खराब; भारत-न्यूझीलंड पहिला टेस्ट ड्रॉ

IND vs NZ 1st test wellington match Draw: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. परंतु, मालिकेतील पहिला सामना ड्रॉ झाला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 23, 2026 | 01:33 PM
IND vs NZ 1st test Drawn

IND vs NZ 1st test Drawn

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाच्या पदरी निराशा
  • शेवटच्या डावात न्यूझीलंडची झुंज
  • पहिल्या कसोटीवर ड्रॉचा शिक्का
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना वेलिंग्टन येथे खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. परंतु, अखेरीस सामना ड्रॉ झाला. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताला डावाने विजय मिळवण्यासाठी ८ विकेट्सची गरज होती.

परंतु, किवी संघाच्या केवळ तीन विकेट्स पडल्या. यानंतर, डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी २५८ चेंडूंचा सामना करत सहाव्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाज हा किल्ला भेदण्यात अयशस्वी ठरले. न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावात पाच विकेट्स गमावून २३९ धावा केल्या. यानंतर, दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हँडशेक करुन सामना ड्रॉ करण्यास सहमती दर्शवली.

IND A vs PAK A: महामुकाबला तापला! तीन अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने उभारला डोंगर; भारताला 314 धावांचं तगडं आव्हान

भारत- न्यूझीलंड पहिला सामना ड्रॉ

भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. किवी संघाने पहिल्या डावात ३६८ धावा केल्या. दरम्यान, हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांनी शानदार शतके झळकावली. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट्स घेतले. प्रत्युत्तरात, भारताने पहिल्या डावात ९ विकेट्स गमावून७२० धावांच्या विशाल धावसंख्येवर आपला डाव घोषित केला. भारतासाठी केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतके झळकावली. यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, आणि ध्रुव जुरेल यांनी शानदार अर्धशतके झळकावली. कर्णधार शुभमन गिल ९८ धावांवर बाद झाला, त्याचे केवळ दोन धावांनी शतक हुकले. दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने ३५२ धावांची आघाडी घेऊन न्यूझीलंडवर दबाव टाकला.

दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दाखवली ताकद

दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र, कर्णधार टॉम लॅथम पुन्हा एकदा अपयशी ठरला. डेव्हन कॉनवे आणि रचिन रवींद्र चौथ्या दिवशी नाबाद राहिले. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात न्यूझीलंडने आपल्या दोन्ही विकेट गमावल्या. कॉनवेने १६५ चेंडूंमध्ये ६५ धावा केल्या, तर रवींद्र ३७ धावांवर बाद झाला. त्यानंतर टॉम ब्लंडेल १५ धावांवर अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर बाद झाला.

तिथून पुढे डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी सूत्रे हाती घेतली. दोघांनीही शानदार फलंदाजी केली आणि ते नाबाद राहिले. मिचेल १८६ चेंडूंमध्ये ४९ धावांवर नाबाद राहिला. फिलिप्स १२६ चेंडूंमध्ये २६ धावांवर नाबाद राहिला. भारतीय संघाकडून, प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतले, तर बुमराह, अंशुल कंबोज आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

Sandpaper Scandal: सँडपेपर कांडवर बोलणं पडलं महागात? उस्मान ख्वाजा अन् डेव्हिड वॉर्नरची थेट कॉमेंट्री पॅनेलमधून हकालपट्टी

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कोण जिंकला?

    Ans: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित (Draw) राहिला.

  • Que: भारतीय संघाने पहिल्या डावात किती धावा केल्या?

    Ans: भारतीय संघाने पहिल्या डावात 9 विकेट्स गमावून 720 धावा केल्या आणि डाव घोषित केला.

  • Que: भारताकडून पहिल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स कोणी घेतल्या?

    Ans: जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.

Web Title: Ind vs nz 1st test wellington match draw india new zealand pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Shubhman Gill
  • Test Series

संबंधित बातम्या

IND vs NZ: बुमराहची भेदक गोलंदाजी, पंतची शतकी खेळी! किवींच्या घरात टीम इंडियाची दादागिरी; चौथ्या दिवशी रचले विक्रमांवर विक्रम
1

IND vs NZ: बुमराहची भेदक गोलंदाजी, पंतची शतकी खेळी! किवींच्या घरात टीम इंडियाची दादागिरी; चौथ्या दिवशी रचले विक्रमांवर विक्रम

IND vs NZ: किवींच्या घरात टीम इंडियाचा धुमाकूळ! पहिल्या डावात ठोकल्या ७२० धावा; कसोटी क्रिकेटमध्ये केला ‘हा’ महारेकॉर्ड
2

IND vs NZ: किवींच्या घरात टीम इंडियाचा धुमाकूळ! पहिल्या डावात ठोकल्या ७२० धावा; कसोटी क्रिकेटमध्ये केला ‘हा’ महारेकॉर्ड

IND vs NZ : पंत-राहुलच्या शतकांचा धमाका ! न्यूझीलंडची अवस्था बिकट, भारताची मोठी आघाडी कायम
3

IND vs NZ : पंत-राहुलच्या शतकांचा धमाका ! न्यूझीलंडची अवस्था बिकट, भारताची मोठी आघाडी कायम

ऋषभ पंतचा शतकी धमाका ! न्यूझीलंडविरुद्ध भारताची पहिल्या डावात मोठी मजल
4

ऋषभ पंतचा शतकी धमाका ! न्यूझीलंडविरुद्ध भारताची पहिल्या डावात मोठी मजल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.