IND A vs PAK A Rising Stars Asia Cup 2026
IND A vs PAK A: रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला सुरु आहे. हा सामना दोहा येथील एशियन टाऊन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार अब्दुल समदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानचा संपूर्ण संघ ५० षटकांत ३१३ धावांवर सर्वबाद झाला. आता भारताला विजयासाठी ५० षटकांत ३१४ धावांची गरज आहे.
पाकिस्तानने या सामन्यासाठी आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोणताही बदल केला नाही. दुसरीकडे, भारताने मागील सामन्याप्रमाणेच आपला अंतिम ११ खेळाडूंचा संघ कायम ठेवला. नाणेफेकीदरम्यान, भारताने नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. भारतीय कर्णधार तिलक वर्माने पाकिस्तानी कर्णधार समदशी हँडशेक केले नाही. (Rising Stars Asia Cup 2026)
भारत अ : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्षित राणा, प्रिन्स यादव.
पाकिस्तान अ: शमील हुसेन, माझ सदाकत, रोहेल नझीर (यष्टीरक्षक), हसन नवाज, अब्दुल समद (कर्णधार), फरहमान युसूफ, साद मसूद, मोहम्मद इम्रान रंधावा, अहमद दानियाल, सुफयान मोकीम, अली रझा.






