
IND vs NZ Final: Indian team breaks records in Champions Trophy final; only second team in the world to do so...
IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंड संघाने भारतासमोर 252 धावांचे आव्हान दिले आहे. डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर 7 विकेट्स गमावून न्यूझीलंड 251 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारतीय वेगवान गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात आली नाही. त्यामुळे न्यूझीलंड संघाला अडीचशेवर धाव संख्या उभारता आली.अन्यथा अडीचशेच्या आतच रोखता आले असते.
भारतीय वेगवान गोलंदाजांकडून फिरकी गोलंदाजांपेक्षा जास्त धावा देण्यात आल्या. वेगवान गोलंदाजांनी 12 षटकांत 104 धावांत केवळ 1 बळी मिळवण्यात यश आले आहे. त्यांचा इकॉनॉमी रेट 8.67 होता. तर फिरकी गोलंदाजांनी 3.79 च्या इकॉनॉमी रेटने 38 षटकांत 144 धावा देत 5 बळी घेतलेअ आहेत. तसेच एक खेळाडू धावबाद झाला आहे.
षटके 1-10: 69/1 (रनरेट: 6.9)
षटके 11-40: 103/4 (रनरेट: 3.43)
षटके 41 -50 : 79/2 (धावगती: 7.9 )
1. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या एका डावात सर्वाधिक फिरकी षटके टाकण्याच्या बाबतीत भारतीय संघ पोहोचला आहे. यापूर्वी 2002 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलंबो येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाकडून भारतीय संघापेक्षा जास्त षटके टाकण्यात आली होती.
3. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक फिरकी षटके टाकलेल्या फिरकीच्या बाबतीत भारताने तिसरे स्थान पटकावले आहे.
हेही वाचा : Ind Vs New : टीम इंडियाने सोडले तब्बल ११ कॅच, फील्डिंगचे तीनतेरा
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 252 धावांचे आव्हान ठेवले आहे. डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर 7 विकेट्स गमावून न्यूझीलंड 251 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताकडून कुलदीप यादवसह वरुन चक्रवर्तीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर जाडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक विकेट मिळवली आहे.