Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: न्यूझीलंडविरूद्ध T20 सिरीजसाठी संघाची घोषणा, 4 वर्षानंतर ‘या’ खेळाडूची धमाकेदार एंट्री; कोण IN आणि कोण OUT?

IND vs NZ: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमारने चार वर्षांनंतर संघात पुनरागमन केले आहे, तर एका खेळाडूला टी-२० मालिकेतून वगळण्यात आले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 07, 2026 | 10:58 AM
न्यूझीलंडविरूद्ध टी२० साठी भारतीय संघाची घोषणा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

न्यूझीलंडविरूद्ध टी२० साठी भारतीय संघाची घोषणा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे
  • यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे
  • तब्बल ४ वर्षाने भुवनेश्वर कुमारला संघात स्थान देण्यात आलंय 
IND vs NZ: न्यूझीलंडच्या आगामी दौऱ्यासाठी भारताचा टी-२० संघ जाहीर करण्यात आला आहे. भुवनेश्वर कुमार चार वर्षांच्या अनुपस्थितीनंतर टी-२० संघात परतला आहे. टी-२० मालिकेसाठी श्रेयस अय्यरसोबत कर्णधार म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड झाली आहे, तर तिलक वर्मा उपकर्णधार म्हणून काम पाहतील. फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला संघातून वगळण्यात आले आहे. टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. 

भुवनेश्वर कुमार चार वर्षांच्या अनुपस्थितीनंतर संघात परतला आहे, तर एका खेळाडूला टी-२० मालिकेतून वगळण्यात आले आहे. भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. ३६ वर्षीय भुवनेश्वर कुमार टी-२० संघात परतला आहे. तो शेवटचा नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडच्या भूमीवर या फॉरमॅटमध्ये खेळला होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) साठी दोन प्रभावी आयपीएल हंगामानंतर भुवी राष्ट्रीय संघात परतला आहे. या वेगवान गोलंदाजाची नुकतीच हाँगकाँग सिक्सर्ससाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे, परंतु टी-२० संघात समावेश असल्यामुळे तो या स्पर्धेत खेळू शकणार नाही.

टी-२० संघातून कोणाला वगळले?

कामाच्या ताणामुळे जसप्रीत बुमराहला टी-२० मालिकेसाठी पुन्हा विश्रांती देण्यात आली आहे. भारत न्यूझीलंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 

अष्टपैलू हार्दिक पांड्या अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे निवडीसाठी उपलब्ध नाही. सध्याच्या टी-२० संघातून वगळण्यात आलेला एकमेव खेळाडू लेग-स्पिनर रवी बिश्नोई आहे. अलीकडील तीन टी-२० सामन्यांमध्ये एकही बळी न मिळाल्याने बिश्नोईला संघातून वगळण्यात आले आहे.

IND vs NZ: पुढच्या आठवड्यात होणार न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, प्रज्ञान ओझाच्या हाती खेळाडूंच्या नशिबाची दोर

बिष्णोईला वगळण्याची कारणं 

या सामन्यांमध्ये २०२६ च्या आशियाई खेळांच्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्याचा समावेश होता. संघात परतल्यानंतर बिश्नोईची सर्वोत्तम कामगिरी अफगाणिस्तानविरुद्ध झाली, जिथे त्याने तीन बळी घेतले. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या मँचेस्टर टी-२० सामन्यात त्याला एकही बळी मिळाला नाही आणि त्याने ६० धावा दिल्या. 

झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत त्याने प्रत्येक सामन्यात एक बळी घेतला. यावर्षी त्याने १२ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३१.१० च्या सरासरीने १० बळी घेतले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात त्याने तीन षटकांत ४४ धावा दिल्या.

रवी बिश्नोईची जागा कोण घेणार?

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर भारताचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती संघात परतला आहे. वरुणने २०२६ मध्ये १६ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळून २४.१५ च्या सरासरीने २० बळी घेतले होते. यावर्षी तो दुखापतींशी झुंजत आहे. 

वरुण न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. आतापर्यंत त्याने न्यूझीलंडविरुद्ध पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ३४ च्या सरासरीने पाच बळी घेतले आहेत. यामध्ये २०२६ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा समावेश आहे, जिथे त्याने फॉर्मात असलेल्या टिम सेफर्टला बाद केले होते.

भारताचा टी२० आंतरराष्ट्रीय संघः श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार

भारताविरुद्ध न्यूझीलंडचा टी२० आंतरराष्ट्रीय संघ कसा असेल?

न्यूझीलंड पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी जवळपास पूर्ण ताकदीचा संघ मैदानात उतरवेल. त्यांनी वेगवान गोलंदाजांवर अधिक लक्ष केंद्रित करणारा संघ निवडला आहे. दुखापतीमुळे रचिन रवींद्र आणि बेन सियर्स टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळू शकणार नाहीत.

न्यूझीलंड संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, झॅक फाउल्क्स, मॅट हेन्री, बेव्हॉन जेकब्स, काईल जेमिसन, ऍडम मिल्ने, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, नॅथन स्मिथ

Web Title: Ind vs nz india t20 squad announcement bhuvneshwar kumar return vs new zealand dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand

संबंधित बातम्या

IND Vs NZ: जगज्जेता बुमराह! न्यूझीलंडच्या निकोलसने केले कौतुक; म्हणाला, ‘जसप्रीत बॉल दोन्ही…’
1

IND Vs NZ: जगज्जेता बुमराह! न्यूझीलंडच्या निकोलसने केले कौतुक; म्हणाला, ‘जसप्रीत बॉल दोन्ही…’

IND vs NZ : सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने दिग्गज नाराज; शास्त्री, गावस्कर आणि रहाणेंचा संताप!
2

IND vs NZ : सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने दिग्गज नाराज; शास्त्री, गावस्कर आणि रहाणेंचा संताप!

IND Vs NZ: अरे हा कॅच तुझा की माझा? सेट बॅट्समनला पडीकलकडून जीवदान, गिलची प्रतिक्रिया Viral
3

IND Vs NZ: अरे हा कॅच तुझा की माझा? सेट बॅट्समनला पडीकलकडून जीवदान, गिलची प्रतिक्रिया Viral

IND vs NZ: अंपायरच्या निर्णयावर कर्णधार गिलचा पारा चढला! DRS वरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल
4

IND vs NZ: अंपायरच्या निर्णयावर कर्णधार गिलचा पारा चढला! DRS वरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.