Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ : सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने दिग्गज नाराज; शास्त्री, गावस्कर आणि रहाणेंचा संताप!

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने रवी शास्त्री, सुनील गावस्कर आणि अजिंक्य रहाणे यांनी नाराजी व्यक्त केली. सिराजला संधी न देण्याचा निर्णय धक्कादायक असल्याचे तिघांनी म्हटले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 19, 2026 | 05:49 PM
IND vs NZ : सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने दिग्गज नाराज; शास्त्री, गावस्कर आणि रहाणेंचा संताप!

IND vs NZ : सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने दिग्गज नाराज; शास्त्री, गावस्कर आणि रहाणेंचा संताप!

Follow Us
Follow Us:
  • सिराजची आकडेवारीही प्रभावी
  • गावस्करांनाही बसला आश्चर्याचा धक्का
  • रहाणे म्हणाले, सिराजला बाहेर बसवण्याला अर्थ नाही!
 

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वगळण्याचा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अशात भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री असो, महान फलंदाज सुनील गावस्कर असो वा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे, या सर्वांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
सिराजसारख्या अनुभवी आणि आक्रमक गोलंदाजाला वेगवान गोलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी असताना संधी न देणे आश्चर्यकारक असल्याचे मत या तिघांनी व्यक्त केले आहे.

वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टेस्ट सामना सुरू आहे. या सामन्यासाठी भारतीय संघानं सिराजला अंतिम अकरामध्ये स्थान दिलं नाही. यावर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून प्रश्न उपस्थित केला.

शास्त्री म्हणाले की, वेग, कौशल्य आणि सीम मूव्हमेंट हे संघ निवडीचे निकष असतील, तर मोहम्मद सिराजला संघात स्थान का मिळालं नाही? सिराजकडे अनुभव, आक्रमकता आणि चेंडूच्या माध्यमातून काहीतरी वेगळे करण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळायला हवे होते, असं मत त्यांनी व्यक्त केले.

सिराजची आकडेवारीही प्रभावी

शास्त्री यांच्या नाराजीमागे सिराजची कामगिरीही महत्त्वाची आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) सध्याच्या चक्रात सिराजने 26.81 च्या सरासरीने 43 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय गोलंदाजांमध्ये तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

विशेष म्हणजे, अंतिम अकरामधून वगळण्यात आलेल्या रवींद्र जडेजाची कामगिरीही प्रभावी राहिली आहे. त्याने 33 विकेट्स घेण्यासोबतच फलंदाजीत 60.76 च्या सरासरीने 790 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर दोन शतके आणि सहा अर्धशतके आहेत.

Temba Bavuma Record : टेंबा बावुमाने रचला इतिहास ! कर्णधार म्हणून पहिल्या 16 कसोटीत सर्वाधिक विजयांचा विक्रम

गावस्करांनाही बसला आश्चर्याचा धक्का

माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनीही सिराजला संघात स्थान न मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. सिराजने आतापर्यंत भारताला कधीही निराश केलेले नाही. त्याची गोलंदाजीतील लय चांगली असून, त्याच्या कामगिरीत कोणतीही मोठी घसरण झालेली दिसत नाही, असे गावस्कर म्हणाले.

सिराजला वनडे संघात स्थान मिळाल्यानंतर त्याला अखेरच्या सामन्यात खेळवण्यात आले होते. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीसाठी त्याला तयार केले जात असल्याचे आपल्याला वाटले होते. मात्र, अंतिम अकरामध्ये त्याचे नाव नसल्याने आश्चर्य वाटल्याचे गावस्कर यांनी सांगितले.

ENG vs AUS: कांगारूंना घरच्या मैदानावर लोळवलं! इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला दणका; मालिका जिंकत वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप

रहाणे म्हणाले, सिराजला बाहेर बसवण्याला अर्थ नाही!

प्रसारणादरम्यान अजिंक्य रहाणेनेही भारतीय संघाच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली. जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे आणि प्रसिद्ध कृष्णानेही अलीकडे चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत अनुभवी सिराजला बाहेर बसवण्याचा निर्णय पटत नसल्याचे रहाणे म्हणाला.

रहाणेने सांगितले की, सिराजने सराव सामन्यात चार विकेट्स घेतल्या होत्या. तो चांगल्या लयात दिसत होता. अशा खेळाडूला अंतिम अकरामध्ये संधी देणे आवश्यक होते. सिराज कोणत्याही परिस्थितीत प्रभावी गोलंदाजी करू शकतो. खेळपट्टीवर मदत नसतानाही विकेट मिळवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. तो स्वतःहून कर्णधाराकडे गोलंदाजी मागतो. त्याची ही आक्रमक वृत्ती संघासाठी महत्त्वाची असल्याचे रहाणेने स्पष्ट केले.

न्यूझीलंडच्या फलंदाजांची भारताविरुद्ध दमदार भागीदारी

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडची अवस्था 70 धावांवर 5 विकेट्स अशी केली होती. मात्र, त्यानंतर हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांनी भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. निकोल्सने नाबाद 113, तर फिलिप्स नाबाद 94 धावांवर खेळत आहे. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 173 धावांची अभेद्य भागीदारी केली. त्यामुळे दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 5 विकेट्सवर 243 अशी झाली होती.

या परिस्थितीत सिराजसारख्या अनुभवी वेगवान गोलंदाजाची उणीव जाणवली असती, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोहम्मद सिराजला का वगळण्यात आले?

    Ans: भारतीय संघाच्या अंतिम अकरामध्ये सिराजला स्थान देण्यात आले नाही. मात्र, त्याला वगळण्यामागचे अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.

  • Que: सिराजला संघाबाहेर ठेवल्याबद्दल कोणी नाराजी व्यक्त केली?

    Ans: माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, सुनील गावस्कर आणि अजिंक्य रहाणे यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

  • Que: अजिंक्य रहाणेने सिराजबद्दल काय म्हटले?

    Ans: सिराज चांगल्या लयीत असून त्याने सराव सामन्यात चार विकेट्स घेतल्या होत्या. अशा अनुभवी गोलंदाजाला बाहेर बसवण्याला अर्थ नसल्याचे रहाणेने म्हटले.

Web Title: Ind vs nz mohammed siraj dropped playing xi shastri gavaskar rahane reaction rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • IND vs NZ
  • Mohammad Siraj

संबंधित बातम्या

IND Vs NZ: अरे हा कॅच तुझा की माझा? सेट बॅट्समनला पडीकलकडून जीवदान, गिलची प्रतिक्रिया Viral
1

IND Vs NZ: अरे हा कॅच तुझा की माझा? सेट बॅट्समनला पडीकलकडून जीवदान, गिलची प्रतिक्रिया Viral

IND vs NZ: अंपायरच्या निर्णयावर कर्णधार गिलचा पारा चढला! DRS वरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल
2

IND vs NZ: अंपायरच्या निर्णयावर कर्णधार गिलचा पारा चढला! DRS वरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

IND vs NZ 1st Test Final Score: निकोलस – फिलिप्सने सावरला डाव, पहिल्या दिवशी ५ विकेट्स गमावून न्यूझीलंडच्या २४३ धावा
3

IND vs NZ 1st Test Final Score: निकोलस – फिलिप्सने सावरला डाव, पहिल्या दिवशी ५ विकेट्स गमावून न्यूझीलंडच्या २४३ धावा

Henry Nicholls Century: हेन्री निकोल्सने आणला भारतीय गोलंदाजांच्या तोंडाला फेस; ठोकले शानदार शतक
4

Henry Nicholls Century: हेन्री निकोल्सने आणला भारतीय गोलंदाजांच्या तोंडाला फेस; ठोकले शानदार शतक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.