
IND vs NZ : हो वचपा काढला, भारतानं सांघिक कामगिरीनं मालिका जिंकली! 200 धावा ही न्यूझीलंडला करू दिल्या नाहीत
IND vs NZ : माउंट माउंगानुई येथील बे ओव्हलमध्ये पार पडलेला मालिकेत शेवटचा ODI सामना रंगतदार ठरला. या सामन्यात भारताने मागील सामन्यातील वाईट अनुभवाला मागे सारत ‘झुंज आमच्या रक्तातच असल्याचे’ सिद्ध केले. भारताने दिलेल्या तुल्यबळ 210 धावांचा बचाव करताना यजमान न्युझीलंडला 187 धावांत रोखले. अशाप्रकारे भारताने ही मालिका 3-1 अशी आपल्या नावे केली. तसेच मागील सामन्यातील पराभवाचा वचपाही भारतानं हा सामना 22 धावांनी जिंकला.
पाच सामन्यांच्या मालिकेतील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. अशाप्रकारे भारताला मालिका जिंकण्यासाठी फक्त पुढील दोन सामन्यातील एका सामन्यात विजयाची गरज होती. पण चौथ्या सामन्यात किवींनी दमदार खेळी करत भारताला 89 धावाच करू दिल्या. ही भारतीय क्रिकेट संघाची खूपच वाईट कामगिरी राहिली. त्यामुळे अखेरच्या सामन्यात काय होणार? असा प्रश्न भारतीय क्रिकेट चाहत्यांना पडला होता, परंतु यंदा भारतीय संघानं आपल्या चाहत्यांचं मन मोडलं नाही. विजयश्री खेचूनच आणली.
रोहित शर्मा व विराट कोहली (रो-को) यांचं वनडेत एक साम्राज्य आहे. पण आता करिअरच्या अखेरच्या टप्प्यात म्हणावी तशी कामगिरी त्यांच्याकडून होताना दिसत नाही. एका सामन्यात खेळल्यानंतर इतर सामन्यात ते दबाव सहन करण्यापलीकडे जातात. चौथ्या सामन्यात दोघेही भोपळा फोडू शकले नाही. तर या महत्त्वाच्या सामन्यात रोहित शर्मा 7 तर विराट 5 धावाच करू शकले. त्यामुळे या दोघांना रोखण्याचं गणित न्युझीलंड गोलंदाजांच्या हाती लागलं की काय असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला. तर दुसरीकडे, वनडे संघात पुन्हा संधी मिळालेल्या ऋतुराज गायकवाड (18)नं संधीचं सोनं करता आलं नाही. कर्णधार श्रेयस अय्यरही 22 धावाच करू शकला.
‘क्रीजवर असताना मी फक्त…’; IND Vs PAK U-19 फायनल जिंकल्यावर मोहित उलवाने दिली प्रतिक्रिया
भारताचा डाव धोक्यात असताना ईशान किसन व अक्षर पटेल चिकाटीनं खेळले. दोघांनी अर्धशतक पुर्ण केले नसले तरी, त्यांनी केलेल्या धावांमुळे भारत 200 धावा टप्पा पार करू शकले. ईशानने 3 चौकार व 2 षटकारांसह 46, तर अक्षरने 5 चौकार व 1 षटकारासह 46 धावा केल्या. अखेरच्या काळात मोहम्मद सिराज व अर्शदीप सिंगने प्रत्येकी 14 धावांचे योगदान देत किवी गोलंदाजांना विकेट घेण्यापासून थोडावेळ रोखले. अशाप्रकारे भारताने 42.1 षटकात सर्वबाद 209 धावा केल्या.
या सामन्यात अर्शदीप व सिराजने सुरुवातीपासूनच किवी फलदाजांना नियंत्रणात ठेवले. टिम सिफर्ट (14) सिराजचा बळी ठरला. तर सलामीला आलेला विल यांग (22) ला अर्शदीपने जास्त काळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. भारताप्रमाणेच न्यूझीलंडची देखील मोठी भागीदारी रचली नाही, पण त्यांनी सामना डोलायमान ठेवला होता. महत्त्वाचे विकेट पडल्यानंतही कर्णधार मिशेल सँटनर (24) तग धरून होता, पण तो नमन धिरचा शिकार ठरला. मिशेलचा सिमारेषेजवळ अर्शदीपने सुंदर झेल टिपला.
त्याआधी डीन फॉक्सक्रॉफ्ट (31) सामना काढतो की काय असे वाटत होते, पण यश ठाकुरने त्याला त्रिफळाचीत करत त्याचे मनसुबे पूर्ण होऊ दिले नाहीत. अखेरच्या काळात भारताच्या गोलंदाजांनी आपली दमदार कामगिरी कायम राखत किवी फलंदाजांना जास्त काळे खेळपट्टीवर टिकू दिले नाही. भारताकडून अर्शदीपने 3, मोहम्मद व अक्षरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
Ans: भारताने न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची वनडे मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली.
Ans: हा सामना न्यूझीलंडमधील माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळवण्यात आला.
Ans: अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि अन्य भारतीय गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला.