India vs Pakistan Asian Games 2026 Final
Ind vs Pak Asian Games 2026: जपान येथे सुरु असलेल्या एशियम गेम्समधील पुरुष क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा दारुण पराभव करत दणदणीत विजय नोंदवला. भारताने हा सामना १९ धावांनी जिंकला. या महत्वाच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माच्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने २० षटकांत ६ विकेट्स गमावून २११ धावा केल्या आणि पाकिस्तानला विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य दिले. परंतु पाकिस्तान संघाने २० षटकांत ६ विकेट्स गमावून फक्त १९२ धावा केल्या.






