Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल

IND vs PAK Asian Games 2026 Final India won Gold Medal: आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला लोळवत शानदार विजय नोंदवला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 03, 2026 | 02:33 PM
photo- BCCI

photo- BCCI

Follow Us
Follow Us:
  • अभिषेक-तिलकचा जलवा
  • अखेरच्या १२ चेंडूंमध्ये पाकिस्तानची कोंडी
  • भारताने जिंकलं गोल्ड
Ind vs Pak Asian Games 2026: जपान येथे सुरु असलेल्या एशियम गेम्समधील (Asian Games 2026) पुरुष क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. हा सामना शनिवारी (३ ऑक्टोबर) निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये खेळवण्यात आला. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा दारुण पराभव करत दणदणीत विजय नोंदवला.

भारताने हा सामना १९ धावांनी जिंकला. या महत्वाच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माच्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने २० षटकांत ६ विकेट्स गमावून २११ धावा केल्या आणि पाकिस्तानला विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य दिले. परंतु पाकिस्तान संघाने २० षटकांत ६ विकेट्स गमावून फक्त १९२ धावा केल्या.या विजयासह भारताने क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले आहे.

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत पावसाचा खोळंबा? चंदीगडमध्ये कसे असेल हवामान, पाहा Weather Report

भारताने पाकिस्तानला पुन्हा चारली धूळ

अंतिम सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, वैभवला आपला डाव पुढे वाढवता आला नाही. सॅम अयुबच्या गोलंदाजीवर विकेटकीपर उस्मान खानने त्याचा झेल घेतला. वैभवने दोन षटकारांसह ९ चेंडूंमध्ये १५ धावा केल्या. वैभव बाद झाला तेव्हा धावसंख्या २८/१ होती. यानंतर, संजू सॅमसन अहमद दानियालच्या गोलंदाजीवर २ धावांवर बाद झाला.

दरम्यान, भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने धडाकेबाज खेळी करत २८ चेंडूमध्ये ६१ धावा केल्या. यामध्ये ३ चौकार आणि ७ षटकारांचा सामावेश होता. तो अराफत मिन्हासच्या गोलंदाजीवर स्टम्प आऊट झाला.भारताला चौथा धक्का ईशान किशनच्या रूपाने बसला. ईशान १८ चेंडूंमध्ये ३ चौकारांसह २० धावा करून अराफत मिन्हासच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर अबरार अहमदने श्रेयस अय्यरला झेलबाद केले. श्रेयस २४ चेंडूंमध्ये २ चौकारांसह २१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयसच्या रुपात भारताची पाचवी विकेट पडली.

दरम्यान, शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी भारतीय संघासाठी अखेरच्या षटकांमध्ये वेगवान खेळी केली. अहमद दानियालने शिवम दुबेला झेलबाद केले. दुबेने १५ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांसह २७ धावा केल्या. मेजर सदाकतने त्याचा झेल घेतला. तिलक वर्माने २२ चेंडूंमध्ये ५१ धावांची शानदार खेळी केली. अखेर टीम इंडियाने २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावून २११ धावा केल्या. पाकिस्तानकडू अहमद दानियाल आणि अराफत मिनहान्स यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतले.

पाकिस्तानचा संघर्ष पण संघ पुन्हा अपयशी

लक्ष्याचा पाटलाग करताना, पाकिस्तानने चांगली सुरुवात केली, पण वॉशिंग्टन सुंदरने चौथ्या षटकात कर्णधार साहिबजादा फरहानला बाद केले. त्यानंतर उस्मान खान आणि माझ सदाकत झटपट बाद झाले. त्यानंतर सॅम अयुब आणि हसन नवाझ यांच्यात एक मजबूत भागीदारी झाली. पाकिस्तानने १२६ धावांवर सॅम अयुबची विकेट गमावली. एकीकेडे विकेट पडण्याचे सत्र सुरु असताना, हसन नवाझने दुसऱ्या टोकाकडून धावा करणे सुरूच ठेवले. परंतु, शेवटच्या षटकात विजयासाठी ३३ धावांची गरज असताना, हसन नवाझ ५१ चेंडूंमध्ये ९६ धावांवर बाद झाला. शिवम दुबेने त्याला झेलबाद केले.भारताकडून अक्षर पटेल, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. भारताने हा सामना १९ धावांनी जिंकून सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी, भारताने २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते.

Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…

Web Title: Ind vs pak asian games 2026 final india won gold medal in mens cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • asian games 2026
  • IND VS PAK
  • India vs Pakistan

संबंधित बातम्या

IND vs PAK: वैभवला आऊट केल्यानंतर अभिषेक शर्माने घेतला बदला, 7 सिक्सर्स मारत केले रेकॉर्ड्स
1

IND vs PAK: वैभवला आऊट केल्यानंतर अभिषेक शर्माने घेतला बदला, 7 सिक्सर्स मारत केले रेकॉर्ड्स

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग
2

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग

Asian Games 2026: ‘भारत की बेटी’, प्रणवी उर्सने रचला इतिहास, सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला गोल्फर
3

Asian Games 2026: ‘भारत की बेटी’, प्रणवी उर्सने रचला इतिहास, सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला गोल्फर

Asian Games 2026: 17 व्या वर्षी कुमकुम मोहोडने रचला इतिहास; रिकर्व्ह महिला व्यक्तिगतमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली खेळाडू
4

Asian Games 2026: 17 व्या वर्षी कुमकुम मोहोडने रचला इतिहास; रिकर्व्ह महिला व्यक्तिगतमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली खेळाडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.