IND VS PAK: Confusion in the country before Asia Cup 2025! Will India-Pakistan match be cancelled? Fans are aggressive on social media
IND VS PAK : 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 ला सुरवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत 10 सप्टेंबरला यूएइविरुध्द पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेची सुरवात करणार आहे. तसेच 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळेल. परंतु आशिया कपपूर्वीच भारतात पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. सोशल मीडियावर चाहते आक्रमक झालेले दिसून येत आहे.
यामागील कारण म्हणजे, अलिकडेच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या हल्ल्याचा परिणाम सर्वच क्षेत्रात झालेला दिसून येत आहे. त्याची झळ क्रिकेट खेळाला देखील लागली आहे. याचा परिणाम म्हणजे भारताने वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीजेंड्स २०२५ मध्ये पाकिस्तानसोबत एकही सामना खेळण्यास नकार दिला होता. चाहते अशीच अपेक्षा आता आशिया कप २०२५ मध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यातबाबत बाळत आहेत. चाहत्यांकडून पाकिस्तानसोबतचा सामना रद्द करण्याची मागणी होताना दिसत आहे.
हेही वाचा : माजी पाकिस्तानी दिग्गज गोलंदाज अडचणीत: Wasim Akram वर ‘हे’ आहेत गंभीर आरोप, तक्रार दाखल
आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध भारत खेळणार आहे. या सामन्याबाबत चाहते केवळ पाकिस्तानचा निषेध करत असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर देखील आता प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. चाहत्यांकडून कोणीही हा सामना पाहू नये अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर सामान्यापूर्वीच येथे जाहिरातींचे स्लॉट प्रति सेकंद लाखोंच्या संख्येने विकले जाऊ लागले आहेत.
चाहेत असे देखील म्हणत आहेत की, यावेळी सामना न पाहता बीसीसीआयला कडक संदेश द्या. त्याच वेळी, काही चाहते म्हणत आहेत की, पाकिस्तानशी झालेल्या वादानंतर देखील १४ सप्टेंबर रोजी सामना आयोजित करण्यात येत आहे. यावेळी आम्ही हा सामना बघणार नाही.
हेही वाचा : Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
माजी महान भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आपल्या परखडमताने पाकिस्तानला आरसा दाखवत असतो. यावेळी त्याने पुन्हा एकदा आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर भाष्य केले आहेत. तो म्हणाला की, “माझा असा विश्वास आहे की जर एखाद्या देशाशी आपले संबंध चांगले नसतील तर त्यांच्यासोबत व्यापार किंवा क्रिकेट देखील खेळता कामा नये. एकीकडे आपले सैन्य बांधव आपले प्राण त्यागत आहेत. दुसरीकडे जर आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळलो तर हे काही योग्य नाही.”