ICC Women’s ODI World Cup 2025 : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ (ICC Women’s ODI World Cup 2025)च्या तोंडावर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्रेस हॅरिसला आयसीसी महिला विश्वचषक संघातून पायाच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर जावे लागले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तिच्या जागी आता हेदर ग्राहमची संघात निवड केली आहे. ग्रेस हॅरिस या अष्टपैलू खेळाडूने सर्व फॉरमॅटमध्ये प्रभावी कामगिरी करून एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले होते, परंतु दुखापतीमुळे तिचे स्वप्नभंगले आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का मनाला जात आहे.
हेही वाचा : IND VS PAK : ‘त्याला IPL मध्येही पंचगिरी…’, फखर झमानच्या बाद होण्यावर शाहिद आफ्रिदीने ओकली गरळ
ऑस्ट्रेलिया संघाने अलीकडेच भारताविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ अशी बाजी मारली आहे. या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांमध्ये हॅरिसचा समावेश करण्यात आला नव्हता, त्यानंतर तिसऱ्या सामन्यासाठी तिला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडण्यात आले होते. तेव्हा दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करताना ग्रेस हॅरिसला पायाच्या स्नायूला ताण आला आणि तीला दुखापत झाली. मार्च २०२४ नंतर हॅरिस तिचा हा पहिलाच एकदिवसीय सामना खेळत होती.
ऑस्ट्रेलियण खेळाडू ग्रेस हॅरिसने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १२ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत, ज्यात तिने १२ विकेट्स काढल्या आहेत. तसेच तिने ५४ टी-२० सामन्यांमध्ये ५७७ धावा फटकावल्या आहेत आणि ९ विकेट्स देखील घेतल्या आहेत.
आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडशी एकमेव सराव सामना खेळणार आहे. तर हॅरिस तंदुरुस्तीसाठी मायदेशी परतणार आहे. यूपी वॉरियर्सची ही अष्टपैलू खेळाडू ९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या २०२५-२६ हंगामासाठी महिला बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीट संघाचा भाग असणार आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या बेंगळुरूमध्ये आहे.
२०२५ महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ १ ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरवात करणार आहे. ऑस्ट्रेलिया आपला पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियन संघाचा भारताशी सामना होणार आहे.
अॅलिसा हीली (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), अॅशले गार्डनर, डार्सी ब्राउन, किम गार्थ, हीथर ग्राहम, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, सोफी मोलिनेक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, जॉर्जिया वॉल, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम.